माजलगावात लॉकडाऊनची दोन तासांची सूट व्यापाऱ्यांनी धुडकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST2021-03-27T04:34:49+5:302021-03-27T04:34:49+5:30
जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय लागू केला आहे. यात जिल्ह्यात किराणा दुकानदारांना दोन तासांची सूट देण्यात आली. हा निर्णय ...

माजलगावात लॉकडाऊनची दोन तासांची सूट व्यापाऱ्यांनी धुडकावली
जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय लागू केला आहे. यात जिल्ह्यात किराणा दुकानदारांना दोन तासांची सूट देण्यात आली. हा निर्णय मनमानी असून, व्यापाऱ्यांना आर्थिक खाईत लोटणारा आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे यापूर्वी अतोनात नुकसान झाले आहे. ८० टक्के दुकानदार हे किरायाने दुकाने घेऊन व्यवसाय करतात. अशा दुकानदारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना विचारात न घेता हा निर्णय लागू करून व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न असल्याच्या भावना माजलगावात व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी माजलगावात किराणा व्यापाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापार करण्यासाठी दिलेली दोन तासांची मुदत धुडकावून लावत आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. येथील आ. प्रकाश सोळंके हे व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील, असे व्यापाऱ्यांना वाटत होते; परंतु आ. सोळंके यांनी व्यापाऱ्यांकडे ढुंकूनही पाहिले नसल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, शुक्रवारपासून लॉकडाऊन असताना पोलिसांच्या कमतरतेमुळे शहरातून नागरिकांचा मुक्तपणे संचार सुरू होता. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात येत असताना त्यांना कोणीच हटकत नव्हते. दुपारपर्यंत पोलीस २-३ चौकात केवळ होमगार्ड आढळून आले. त्यानंतर अनेक चौकांत ते आढळून आले नाहीत. यामुळे नागरिकांचा वावर सुरूच होता. प्रशासनाने कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून लॉकडाऊन केले. मात्र, नागरिकांच्या मुक्त संचारामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
===Photopath===
260321\img_20210326_122320_14.jpg
===Caption===
माजलगावात लॉकडाऊनची दोन तासाची सुट व्यापाऱ्यांनी धुडकावली. दुकाने बंद ठेवली.