शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Majalgaon Parishad Election Result 2025: माजलगावात नगराध्यक्षपदी 'तुतारी'चा गजर; तर आमदार सोळंकेंचा उमेदवार तीन नंबरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:10 IST

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये एकीचे प्रदर्शन दिसून आल्याने जोरदार मुसंडी मारली

माजलगाव ( बीड) : येथील नगरपालिकेची निवडणूकीपुर्वी विकासाचा गाजावाजा करणाऱ्या येथील आमदार प्रकाश सोळंके यांच्या उमेदवाराला मतदारांनी तीन नंबर वर पाठवत मोठा उलटफेर केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये एकीचे प्रदर्शन दिसून आल्याने माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या सून महरीन शिफा बिलाल चाऊस यांनी अडीच हजार मतांनी दणदणीत विजय प्राप्त करत नगराध्यक्ष पद पटकावले.

यापूर्वी नगरपालिकेच्या अनेक निवडणुकीत भाजप, शिवसेना यांचा बालेकिल्ला समजला जात होता. भाजपाचे उमेदवार संध्या ज्ञानेश्वर मेंडके या जातीय समीकरणात विजय होतील असे दिसत होते. परंतु येथील भाजपामध्ये नेतृत्व करणारे कोणीच नसल्याने व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत प्रभाग चार मधून दीपक मेंडके हे भाजपच्या तिकिटावर निवडून जरी आले असले तरी हा त्यांचा विजय हा त्यांच्या स्वकर्तत्वावर असल्याचे बोलले जात होते. तर याच प्रभागातून दुसऱ्या जागेवर त्यांच्या पत्नी रेश्मा मेंडके यांचा देखील विजय झाला. भाजप शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या जवळपास अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याचे दिसून आले. यामुळे भाजप व दोन्ही शिवसेनेचा सुपडा साफ झाल्याचे दिसून आले. 

मागील अनेक वर्षापासून विकासाचा गाजावाजा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. प्रकाश सोळंके यांनी शहराच्या विकासासाठी २०० ते ३००कोटी पेक्षा जास्त निधी आणला. मात्र, असला तरी शहरात झालेली कामे ही अतिशय निकृष्ट होत असताना आमदार सोळंके यांनी याबाबत भ्र शब्द देखील वापरला नसल्याने भ्रष्टाचाराला त्यांचे प्रोत्साहन दिसून आले. शहराच्या विकासासाठी आलेले करोडो रुपयांचा निधी पाण्यात गेल्यामुळे मतदारांनी त्यांच्या उमेदवाराला तीन नंबरवर पाठवले. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महरीन शिफा बिलाल चाऊस यांना तिकीट दिले होते . या निवडणुकीत यांच्या प्रचाराची धुरा बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी उचलली होती. त्याचबरोबर मोहन जगताप, नारायण डक, सहाल चाऊस यांनी एकी दाखवल्याने त्यांचा विजय सुकर होऊ शकला. त्यामुळे सहाल चाऊस यांच्या सून नगराध्यक्ष पदावर विराजमान होऊ शकल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे १० , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १० , काँग्रेस १ ,भाजप १, एम.आय.एम --१ व अपक्ष ३ नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले.

अनेकांना मतदारांनी नाकारलेप्रभाग १० मध्ये मतदारांनी माजी आ. राधाकृष्ण होके पाटील यांचे पुतणे अभय होके पाटील , भाजपा सोशल मीडिया सेलचे दत्ता महाजन, भाजपाचे शहराध्यक्ष विनायक रत्नपारखी , मुंबई बाजार समितीचे माजी सभापती अशोक डक यांचे पुतणे अजिंक्य डक , माजी नगराध्यक्ष सुमनबाई मुंडे यांना मतदारांनी नाकारले तर माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांना केवळ १२७ मते मिळाल्याने त्यांना आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Majalgaon Election: 'Tutari' wins, Solanke's candidate trails at third position.

Web Summary : Mahrin Chaus of NCP (Sharad Pawar) won Majalgaon mayoral election defeating MLA Solanke's candidate. Voters rejected BJP due to internal conflict and substandard development works. Several prominent candidates faced defeat.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६