माजलगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:12 IST2021-09-02T05:12:09+5:302021-09-02T05:12:09+5:30

माजलगाव : ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरूने त्यांच्यावर हल्ला केला. यात ...

Majalgaon Municipal Council employees strike | माजलगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

माजलगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

माजलगाव : ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरूने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या हाताची बोटे कापली. या घटनेच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन केले.

नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवहर शेटे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांची बैठक झाली. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली. अशा घटनांमुळे संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्याचे खच्चीकरण होते. त्यामुळे अशा हल्ल्यांचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी शिवहर शेटे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन दिले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे, लेखापाल प्रतिमा पासलकर, सय्यद शकिला, प्रकाश इके, सखाराम होके, सुभाष होंगे, भुजंग गायकवाड, भगवान काळे आदींचा समावेश होता.

310821\purusttam karva_img-20210831-wa0030_14.jpg

Web Title: Majalgaon Municipal Council employees strike