नगराध्यक्ष निवडीच्या चुरशीत नगरसेविका घरी अन पती,मुले सहलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 04:29 PM2020-10-31T16:29:48+5:302020-10-31T16:31:27+5:30

राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या समर्थनातील नगरसेवकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे.

for the majalgaon mayoral election's voter Nagarsevika at home while their Husband and children on trip | नगराध्यक्ष निवडीच्या चुरशीत नगरसेविका घरी अन पती,मुले सहलीवर

नगराध्यक्ष निवडीच्या चुरशीत नगरसेविका घरी अन पती,मुले सहलीवर

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीने उभारलेल्या तटबंदीला सुरुंग लागून ऐनवेळी चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- पुरूषोत्तम करवा 
माजलगाव :  येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक ९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या चुरशीच्या निवडणुकीत नगरसेवकांचे मत परिवर्तन करून फोडाफोडीचे राजकारण जोर धरत असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या समर्थनातील नगरसेवकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. मात्र, सहलीत नगरसेविका घरी आणि पती आणि मुलेच सहलीवर गेले असल्याची माहिती आहे.  खऱ्या मतदार असलेल्या नगरसेविकाच घरी असल्याने त्यांच्या इतर नातेवाईकांच्या मदतीने ऐन निवडणुकीत विरोधक बाजी उलटवीण्याच्या तयारीत आहेत.

माजलगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे यासाठी भाजपाकडून रेश्मा दीपक मेंडके यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून शेख मंजूर यांनी अर्ज भरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने १७-१८ नगरसेवक आपल्या बाजूने असल्याचा दावा केला असून सदर नगरसेवकांना सहलीवर पाठविले असल्याचे सांगण्यात येते.  यामध्ये राष्ट्रवादी पाठोपाठ मोहन जगताप, सहाल चाऊस या गटांच्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे. परंतु, खरंच नगरसेवकच सहलीवर गेलेत का याची चाचपणी केली असता कांही नगरसेविकांचे पती तर काहींची मुले हेच सहलीवर गेली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या निमित्ताने महिला नागरसेविकांचे नातेवाईकच मजा करत असून खरे मतदार असलेल्या नगरसेविका या घरीच असल्याचे चित्र आहे. यावरून नगरसेविकांना त्यांचे अधिकार देखील मनाने वापरता येत नाहीत या बद्दल संताप व्यक्त केला जात आहे. 

विरोधक संधी साधणार ?
नगरसेविकांचे पती व मुले सहलीवर असताना इकडे त्यांच्या इतर नातेवाईकांना हाताशी धरून दगाफटका घडवून आणण्यासाठी विरोधी गटाने कंबर कसली आहे. यातूनच खऱ्या मतदार असलेल्या नगरसेविकांची मनधरणीचे प्रयत्न देखील सुरू केले असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादीने उभारलेल्या तटबंदीला सुरुंग लागून ऐनवेळी चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: for the majalgaon mayoral election's voter Nagarsevika at home while their Husband and children on trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.