धाकट्या अलंकापुरीत महाशिवरात्र सोहळा प्रारंभ- A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:21+5:302021-03-07T04:30:21+5:30
ब्रम्हलीन संत आबादेव महाराज यांनी प्रारंभ केलेला हा सोहळा अगदी सर्वदूर प्रसिद्धीस नेण्याचे काम विद्यमान महंत स्वामी विवेकानंद शास्त्री ...

धाकट्या अलंकापुरीत महाशिवरात्र सोहळा प्रारंभ- A
ब्रम्हलीन संत आबादेव महाराज यांनी प्रारंभ केलेला हा सोहळा अगदी सर्वदूर प्रसिद्धीस नेण्याचे काम विद्यमान महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी केले आहे. जवळपास पंचवीस तीस गावांत एक महिन्यापासून या सोहळ्याची चर्चा असते. सिंदफणाकाठी हेमाडपंथी असलेले हे शिवालय जागृत देवस्थान मानले जाते. हजारो भाविक सात दिवस या सप्ताहात आध्यात्मिक तृप्ती मिळवतात. गेली बेचाळीस वर्षे अविरत चालू असलेला हा सोहळा मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे आखडता घ्यावा लागला.
शुक्रवारी सकाळीच विवेकानंद शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली व अतुल महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण सुरू झाले. दुपारी टाळ, विणा, मृदंग पूजन होऊन गाथाभजन आणि पाच ते सहा या वेळेत संभाजी महाराज यांचे ज्ञानेश्वरी प्रवचन, नंतर हरिपाठ असा नित्य कार्यक्रम झाला .
संदीप महाराज शेवाळे (वीणा), महेंद्र महाराज मळेकर (मृदंग), चंद्रकांत महाराज वारंगुळे (गाथाभजन ) नेतृत्व करत आहेत. या सप्ताहासाठी श्रीक्षेत्र भगवानगडाचे साधक वर्ग उपस्थित आहेत. हजारो भाविकांची या कालावधीत वर्दळ असते; मात्र यावर्षी सिध्देश्वराचा दरबार कोरोनामुळे सुनासुना वाटत असल्याचे दिसून येत आहे. नाइलाजास्तव आणि आरोग्यास बाधा नको म्हणून हा निर्णय घ्यावा लागला असल्याची खंत महंत विवेकानंद शास्त्री यांनी व्यक्त केली .
===Photopath===
060321\06bed_1_06032021_14.jpg