शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Maharashtra Election 2019 : 'राजनीती'साठी नाहीतर 'देशहिता'साठी हटवले कलम ३७०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 2:58 PM

या निवडणुकीत 'रेकॉर्ड ब्रेक' विजय होईल 

परळी : दोन महिन्यांपूर्वी कलम 370 हटविल्याने न्याय मिळाला आहे. हा निर्णय घेण्यात आला तेव्हा विरोधकांनी याला प्रचंड विरोधात झाला. भाजप पक्षाच्या जन्मापासून कलम ३७० ला विरोध करत आहे. हा राजनीतीचा निर्णय नसून देशहिताचा निर्णय आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परळीतील जाहीर सभेत केले. तसेच या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

येथील वैद्यनाथ महाविद्यालया समोरील जागेत बीड जिल्ह्यातील महायुती च्या  उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी दुपारी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेस व्यासपीठावर  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार प्रीतम मुंडे, मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह बीड जिल्ह्यातील युतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. 

परळीत आगमन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन सभेस हजेरी लावली. भाषणात बाबा वैद्यनाथाच्या पावन भूमीत व गोपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत आलो असल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, बीड जिल्ह्याने मागील निवडणूकित भाजपला साथ दिली. या निवडणुकीतही रेकॉर्ड होईल असा विजय होईल, मराठवाड्यात पाण्याचे संकट आहे, दुष्काळी स्थिती आहे.  दुष्काळ हटविण्यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत, 2022 पर्यत घराघरात शुद्ध पाणी शासन  पुरविणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होत आहे. विविध 400 योजनांचे पैसे साडे आठ लाख करोड रुपये लाभार्थीच्या खात्यात शासन जमा करीत आहे. या निर्णयामुळे थेट पैसे लाभार्थ्यांना मिळत आहेत. 

गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण होत आहेत ते पुढे म्हणाले की, सरकारने गरिबांना मोफत उपचार, घर , वीज,गॅस सिलेंडर  दिले आहे. केंद्र सरकार जलजीवन मिशन योजने अंतर्गत येणाऱ्या 5 वर्षात घराघरात  पाणी पोचविणार आहे पाण्यासाठी साडे तीन लाख करोड रुपये खर्च केले जाणार आहेत. गोपीनाथराव मुंडे यांचे परळी- बीड -नगर रेल्वेचे व ऊसतोड मजुरांच्या महामंडळाचे स्वप्न पूर्ण होत आहे. बीड जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. महिला बचत गटाच्या कार्याचा उल्लेख करून बीड जिल्यात महिलांचे मतदान जास्त व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पंकजा मुंडे  व  सर्व उमेदवारांनी पंतप्रधानाचे वैद्यनाथाची मूर्ती  देऊन स्वागत केले.

वैद्यनाथाचे दर्शन घेऊन सभेस सुरुवात परळीत आगमन होताच पंतप्रधान मोदी यांनी सर्वप्रथम 12 ज्योतिर्लिंगा पैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच प्रभू वैद्यानाथाच्या मंदिरात येऊन दर्शन घेतले आहे. यानंतर ते सभेच्या ठिकाणी गेले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीparli-acपरळीPankaja Mundeपंकजा मुंडे