शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Maharashtra Election 2019 : परळीच्या विकासात पंकजा मुंडे यांनी खीळ घातली; धनंजय मुंडे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 19:54 IST

विकासाला विरोध केला नसता तर आज परळीची एम.आय.डी.सी. पूर्ण झाली असती

परळी : पंकजाताई मुंडे यांनी परळीच्या मतदारांची बांधिलकी ठेवून विकासाला विरोध केला नसता तर आज परळीची एम.आय.डी.सी. पूर्ण झाली असती, स्वतःच्या पक्षातील आमदारांना लक्षवेधी मांडायला लावणे, नगरपालिकेचा फंड बांधकाम विभागाला स्थलांतरीत करणे, पालिकेची अडवणूक करणे या माध्यमातून विकासाला त्यांनी सातत्याने खिळ घातली असल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी केला.

परळी शहराच्या सुभाष चौक, बरकतनगर भागात झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा परळीत येणार असले तरी परळीकरांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल असलेला विश्वास आणि विजय दिसत आहे.परळीच्या जनतेचे जीवनमान बदलून टाकण्यासाठी मला आशीर्वाद द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, बाळासाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबु नंबरदार, कृ.उ.बा.समिती सभापती अ‍ॅड.गोविंदराव फड, उनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, वैजनाथराव सोळंके, एस.ए. समद, प्रा.डॉ.विनोद जगतकर, शकील कुरेशी, अजिजभाई, राजाखान गुत्तेदार, प्रा.रघुनंदन खरात, माणिक कांबळे, अन्नपुर्णाताई जाधव, अर्चनाताई रोडे, सुलभाताई साळवे, विजय भोयटे, केशव गायकवाड, शेख शम्मो, अनंत इंगळे, शंकर कापसे, शेख अजिज, महेंद्र रोडे, गायकवाड, जावेद कुरेशी, प्रितम जाधव, लालाखा पठाण, मुखीद कुरेशी, महेबुब कुरेशी, सय्यद सिराज, दिनेश गजमल, शेख सिकंदर, मेहमुद खान, दत्ता सावंत, गोविंद कुकर, जुबेर बाबा, फीरोज भाई, सिराज भाई आदींसह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे