शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : 'जगावं की मरावं, या मानसिक स्थितीत मी', धनंजय मुंडे भावनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 12:44 IST

Maharashtra Election 2019 : सोशल मीडियावर धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

बीड - परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी केलेले आरोप आणि व्हायरल क्लिपसंदर्भात राष्ट्रवादीचे परळी मतदारसंघातील उमेदवार धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन ते चुकीची व्हिडीओ क्लिप बनविण्यात आल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्यावर टीका करताना, आमच्या दोघात केवळ हाच फरक असल्याचं सांगत त्यांना टार्गेट केलं होतं. मी पंडित आण्णांच्या घरात जन्माला आलो आणि त्या गापीनाथ मुंडेंच्या घरात जन्माला आल्या. त्या मोठ्याच्या पोटी जन्माला आल्या, असे म्हणत धनंजय यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली होती.

सोशल मीडियावर धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपनंतर धनंजय मुंडेंना महिला आयोगाकडून नोटीसही बजावण्यात येणार आहे. याप्रकरणी धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली, यावेळी नात्यावरील अर्वाच्य टीका-टीपण्णीमुळे ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं  

''मला सहा बहिणी आहेत, मलाही तीन मुली आहेत. बहिण-भावाच्या नात्याला ज्यांनी डाग लावायचा प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे. नव्याने आलेले लोकच बहिण-भावाच्या नात्यामध्ये विष कालवायचा प्रयत्न करत आहेत. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत मीही फिर्याद दाखल केली, पण पोलिसांनी माझी फिर्याद घेतली नाही. काहींना तर वाटतंय मी पृथ्वीतलावरच नसलो पाहिजे, हे मला खूप वेदनादायी आहे'', असे धनंजय मुंडेंनी म्हटले.  

आपण सर्वांनी माझे आजपर्यंतचे भाषण पाहा, माझ्या बहिणीच्या बाबतीत मी कधीही-कुठेही आक्षेपार्ह बोललो नाही. मी केवळ सरकार आणि मंत्र्यांवर टीका करण्याचा राजधर्म पाळत आलो. 17 तारखेचं माझं भाषण एटिड करुन व्हायरल करण्यात आलंय, हे कशासाठी?. मी 2009 साली या मतदारसंघाचा त्याग केला, माझ्या बहिणीला मी निवडूण आणलं. जगाव का मरावं या मानसिक स्थितीत मी आहे. ज्याला तुम्ही 5-7 वर्षापूर्वी खलनायक ठरवत होता, तो आज स्वत:च्या कर्तृत्वावर नायक झालाय म्हणून ते तुम्हाला बघवत नाही, असे म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेच्या गटातील काही स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत, असा खुसाला मुंडेंनी केलाय. तसेच, मी तसं विधान केलंच नसून त्याची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपाणसी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.     

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPankaja Mundeपंकजा मुंडेparli-acपरळीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019