शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : मलाही तीन मुली, पंकजा अन् माझं रक्ताचं नातं; धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 13:15 IST

पंकजा मुंडेंबाबत धनंजय मुंडेंनी आक्षेपार्ह विधान केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.

परळीः पंकजा मुंडेंबाबत धनंजय मुंडेंनी आक्षेपार्ह विधान केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर धनंजय मुंडेंवर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात खुलासा केला आहे. मी भाषण करत असताना जे बोललो त्या क्लिपमध्ये एडिटिंग करून अर्थाचा अनर्थ काही नवीन भावांनी केला आहे. मी दोषी नसताना मला दोषी ठरवलं जातंय. मला असं वाटतंय की जग सोडूनच जावं, माझ्यासारख्या भावावरती एवढा अभद्र आरोप लावला जात असेल तर मला जीवनही नको, मलाही सख्ख्या तीन बहिणी आहेत, मला चुलत सहा बहिणी आहेत. मलाही तीन मुली आहेत.माझ्यावर असे आरोप लावल्यानं माझ्या तीन बहिणी, तीन मुली, बायको, आई यांना वेदना झाल्या आहेत. अशा प्रकारचं शेवटचं अस्त्र वापरून बहीण-भावाच्या नात्याला डाग लावायचा जो कोणी प्रयत्न केला आहे, त्याच्या मुळापर्यंत मी जाणारच आहे, पण नव्यानं आलेले भाऊ या बहीण भावाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. विड्यातली माझ्या सभेचं भाषण ऐकलं असेल तर मी एकही शब्द चुकीचा बोललेलो नाही. माझ्यावर तसे संस्कार नाहीत, असंही धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला आठवतं, कळतं त्यावेळेपासून मी माझ्या सख्ख्या बहिणींकडूनही कधी राखी बांधून घेतली नाही. रक्षाबंधन किंवा भाऊबीज मी पंकजाताई, प्रीतमताई आणि नंतर यशस्वी यांच्यासोबत साजरी करायचो. त्यांच्याकडूनच राखी बांधून घ्यायचो. मागच्या पिढीतही दोन भावांमध्ये काहींनी विष कालवलं आणि त्याचे परिणाम मी भोगतोय, आता या पिढीतही तोच प्रकार केला जातो. पण आमचं बहीण-भावाचं नातं हे रक्ताचं नातं आहे. या रक्ताच्या नात्यामध्ये माझ्या शब्दाच्या अर्थाचा अनर्थ कोणी काढला, याच्याबाबतीत मी खोलवर जाणार आहे. पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे धनंजय मुंडेंना नोटीस बजावण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परळी विधानसभा मतदारसंघात वैयक्तिक पातळीवर टीका टीपण्णी करण्यात आल्याने गालबोट लागलं. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीका करताना, पंकजा यांना बहीणबाई म्हटले. तसेच आमच्या बहीणबाईंच्या शब्दाला किंमत आहे, कारण त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. तर, आम्ही पंडित आण्णांचे पुत्र असल्याने आमच्या शब्दाला कमी किंमत असल्याचे धनंजय यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळी