शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोठा धक्का... खुद्द शरद पवारांनी ज्यांना दिली उमेदवारी, त्या नमिता मुंदडा भाजपावासी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:50 IST

केजमध्ये भाजपा आमदार संगीता ठोंबरेंचे तिकीट कापले, नमिता मुंदडा उमेदवार,

ठळक मुद्दे शरद पवारांना किंगमेकर पंकजा मुंडे यांचा आणखी एक धक्का

- सतीश जोशी

बीड :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन केज मतदार संघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता अक्षय मुंदडा यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. राष्ट्रवादीकडून जाहीर केलेल्या नमिता मुंदडांना भाजपाची उमेदवारी देऊन किंगमेकर पंकजा मुंंडे यांनी शरद पवार यांना आणखी एक धक्का दिला आहे.

सहा महिन्यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उस्मानाबाद-लातूर आणि बीड मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी रमेश कराड यांना पवारांनी जाहीर केली होती परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी मागे घेऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी या मतदार संघातून राष्ट्रवादीतून भाजपात घेतलेल्या सुरेश धसांना पंकजा मुंडे यांनी अशक्यप्राय असा विजय मिळवून दिला होता. आता विधानसभा निवडणुकीतही उमेदवारीबाबत असेच घडले आहे. या मतदारसंघात विद्यमान भाजपा आमदार संगीता ठोंबरेंचे तिकीट कापले आहे.

राज्याच्या माजी  आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादीच्या नेत्या स्वर्गीय विमल मुंदडा यांच्या सुनबाई नमिता मुंदडा यांनी पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या चिन्हावर केज विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या  दोघांसोबत  मुंदडा कुटुंबाचे फारसे जमलेच नाही. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजी वाढतच गेल्याने मुंदडा कुटुंबिय भाजपात गेले आहे.  दिवंगत डॉ विमल मुंदडा यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ सन 1990 साली भाजपा मधून झाला.1990 व 1995 या दोन टर्म त्या भाजपा मधूनच निवडुन आल्या होत्या. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीकडूनही विमल मुंदडा तीन वेळा म्हणजे सलग पाच वेळा निवडून आल्या होत्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडे