पथदिव्यांसाठी महावितरणचाच पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:10 IST2019-07-27T00:08:23+5:302019-07-27T00:10:03+5:30
पथदिव्यांसाठी स्वतंत्र मीटर नसल्याने मागील काही वर्षांपासून बील भरण्यावरून पालिका व महावितरण यांच्यात वाद होता.

पथदिव्यांसाठी महावितरणचाच पुढाकार
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पथदिव्यांसाठी स्वतंत्र मीटर नसल्याने मागील काही वर्षांपासून बील भरण्यावरून पालिका व महावितरण यांच्यात वाद होता. अखेर महावितरणननेच पुढाकार घेत २ कोटी ४१ लाख रूपयांचा आराखडा तयार केला. यामधून आता नवीन पाचव्या तारीसह अॅटो स्वीच, मिटर बसविले जाणार आहेत. यामुळे आता पालिका व महावितरणचा वाद मिटणार असल्याचे दिसते.
शहरात सध्या ४० टक्के ठिकाणी पाचवी तार आहे. याच पाचव्या तारीवरून पथदिव्यांना वीज जोडणी दिलेली आहे. तर जेथे पाचवी तार नाही, अशा ठिकाणी चारपैकीच एका तारेला जोडणी देऊन पथदिवे सुरू केले जात होते. तसेच चालू बंद करण्याची व्यवस्था कर्मचाऱ्यांमार्फत केली जात होती. अनेकदा कर्मचाऱ्यांचा हलगर्जी, सुट्टया, आंदोलने, बहिष्कार आदी कारणांमुळे पथदिवे कोणीच बंद करीत नसे. त्यामुळे वीजेचा अपव्यय होत होता. याचा फटका पालिकेला बसून लाखो रूपये बील येत असे. हाच धागा पकडून तत्कालीन मुख्याधिकाºयांनी स्वतंत्र वीज मीटरसाठी अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठविले होते. महावितरणकडूनही असे करण्यासाठी निधीची तरतूद लागत असल्याने त्यांनी नकार दिला. मीटर बसविणे आणि बील भरण्यावरून पालिका, महावितरणमध्ये काही महिन्यांपासून धुसफूस सुरू होती.
दरम्यान, यासंदर्भात पालिका, महावितरणच्या अधिकाºयांनी वारंवार बैठका घेतल्या. अखेर महावितरणनेच पुढाकार घेत २ कोटी ४१ लाख रूपयांचा नवीन आराखडा तयार केला. यामध्ये नवीन तार बसविणे, अॅटो टायमर स्वीच, मिटर बसविण्याचा समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. हा प्रस्ताव २३ जुलै रोजी लातूरच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे.
५७२ खांबाची मागणी
शहरात बहुतांश ठिकाणी दूर दूर खांब आहेत. त्यामुळे तारेचा झोल पडलेला आहे. त्यामुळे महावितरणने एका किमी मागे २ याप्रमाणे एकूण ५७२ खांबांची मागणी केल्याचे सांगण्यात आले.