गळ्यातील हरवलेले गंठन सापडले जिन्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:26 IST2020-12-26T04:26:04+5:302020-12-26T04:26:04+5:30

बीड : महिलेच्या गळ्यातील हरवलेले दीड लाख रुपये किमतीचे गंठन बीड शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे सापडले आहे. २२ डिसेंबर रोजी ...

A lost lump in the neck was found under the stairs | गळ्यातील हरवलेले गंठन सापडले जिन्याखाली

गळ्यातील हरवलेले गंठन सापडले जिन्याखाली

बीड : महिलेच्या गळ्यातील हरवलेले दीड लाख रुपये किमतीचे गंठन बीड शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे सापडले आहे.

२२ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यातील फोन खणाणला. शहरातीलच सावता माळी चौक येथील रहिवासी जयाबाई साधू लगड यांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे गंठन चोरीस गेल्याची फिर्याद नोंदविली.

ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी बीड शहर डीबी पथकास तात्काळ घटनास्थळी रवाना केले. यावेळी चौकशीकामी एका रिक्षाचालकास ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्याच्याकडून काहीच माहिती मिळाली नाही.

यानंतर पोलिसांनी लगड यांच्या घराची झडती घेतली. घराच्या बाहेर जिन्याखाली ते गंठन आढळून आले. यानंतर हा मुद्देमाल त्यांना परत करण्यात आला. यावेळी सानप यांच्यासह नरहरी, चक्रे, असलम खान पठाण, संजू राठोड, सुदर्शन सारणीकर, राम आघाव आदी उपस्थित होते. पोलिसांच्या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Web Title: A lost lump in the neck was found under the stairs