खासगी क्लासचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:43+5:302021-06-27T04:21:43+5:30

------------------------ सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे अंबाजोगाई : बहुतांश शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता जवळपासच्या शहरात राहत असून, तिथून आपला ...

Loss of private class | खासगी क्लासचे नुकसान

खासगी क्लासचे नुकसान

------------------------

सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे

अंबाजोगाई : बहुतांश शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता जवळपासच्या शहरात राहत असून, तिथून आपला कारभार सांभाळत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामीण नागरिकांनी केली. आहे. विशेष म्हणजे, सध्या शेती हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना विविध कागदपत्रांची गरज असते. अशावेळी कर्मचारी मुख्यालयी नसल्याने त्यांच्या शोधात नागरिकांना शहरात यावे लागत आहे.

-----------------------------

रस्ते खोदल्याने झाला चिखल

अंबाजोगाई : शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने काम बंद होते. मागील काही दिवसांपूर्वी शिथिलता दिल्यानंतर काम सुरू करण्यात आले. मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने खोदकाम केल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मातीने रस्ते चिखलमय झाले आहेत. या चिखलामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

------------------------

इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त

अंबाजोगाई : तालुक्यात दूरसंचार विभागाची इंटरनेट सेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. विद्यार्थ्यांनाही यामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

------------------------------------

अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री

अंबाजोगाई : पावसाळा सुरू झाला असून, अस्वच्छतेच्या वातावरणात अन्न पदार्थाची विक्री केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. शहरातील मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी खाद्य पदार्थांची दुकाने लावली लावली जात आहेत. यावर न. पा. तसेच अन्न, औषध प्रशासनाने कारवाई करून उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

-------------------------

बेरोजगारांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करावेत

अंबाजोगाई : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरतीवर बंदी असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना बँकांनी अर्थसाहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास कानसूरकर यांनी केली आहे.

Web Title: Loss of private class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.