ऑनलाईन शिक्षण आहे तोपर्यंत शाळेची वेळ सकाळचीच ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:59+5:302021-07-09T04:21:59+5:30
या ऑनलाईन शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा यावेळेत भरविण्यात याव्यात. त्यामुळे पालकांचे मोबाईल सकाळच्या सत्रात मुलांना वापरता येतील. एकाच ...

ऑनलाईन शिक्षण आहे तोपर्यंत शाळेची वेळ सकाळचीच ठेवा
या ऑनलाईन शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा यावेळेत भरविण्यात याव्यात. त्यामुळे पालकांचे मोबाईल सकाळच्या सत्रात मुलांना वापरता येतील. एकाच घरात दोन विद्यार्थी असल्यास त्यांना आई आणि वडील या दोघांच्याही मोबाईलचा वापर करून ऑनलाईन शिक्षण घेता येईल. सकाळी दिल्या जाणाऱ्या शिक्षणास अधिक प्रतिसाद सकाळच्या सत्रात मिळत होता. हे शिक्षण प्रभावीपणे विद्यार्थ्यांना समजू शकते. सकाळच्या सत्रात ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थ्यांकडून ९० टक्के प्रतिसाद मिळत होता. हाच प्रतिसाद सकाळी अकरा ते सायंकाळी पाच यावेळेत केल्यास ६० टक्क्यांवर आल्याचे एका प्रयोगातून सिद्ध झाले आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि जास्तीत जास्त मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ होण्यासाठी शाळा सकाळी भरविणेचे आदेश काढावेत, अशी मागणी रामभाऊ कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आली आहे.