लोकन्यायालय व ऑनलाइन गुरुपौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST2021-07-27T04:34:34+5:302021-07-27T04:34:34+5:30

न्यायालयात असणारे प्रलंबित दिवाणी दावे, दाखल पूर्व प्रकरण, बँकेची कर्ज प्रकरणे, चेकबाबतची प्रकरणे, ग्रामपंचायत, नगरपंचायतीची थकबाकी प्रकरणे, घरगुती कौटुंबिक ...

Loknayalaya and online Gurupournima | लोकन्यायालय व ऑनलाइन गुरुपौर्णिमा

लोकन्यायालय व ऑनलाइन गुरुपौर्णिमा

न्यायालयात असणारे प्रलंबित दिवाणी दावे, दाखल पूर्व प्रकरण, बँकेची कर्ज प्रकरणे, चेकबाबतची प्रकरणे, ग्रामपंचायत, नगरपंचायतीची थकबाकी प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद, पोटगीची प्रकरणे आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे हे सामोपचाराने आपसात तडजोड करण्यासाठी १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून पक्षकारांनी आपली न्यायालयात दाखल असलेली व दाखल पूर्व प्रकरणे हे लोकन्यायालयाच्या माध्यमातून आपसात तडजोड करून घ्यावीत. न्यायालयात येताना प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे, आपसात वैयक्तिक अंतर राखणे व हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ धुऊनच प्रवेश करावा आणि लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश ए.टी. मनगिरे यांनी केले आहे.

भागवताचार्या साध्वी अनुराधांचे प्रवचन ऑनलाइन

शिरूर कासार : शुक्रवारी गुरुपौर्णिमा साजरी झाली. मात्र, कोरोनामुळे गुरूशिष्यांतदेखील दुरावा निर्माण झाला होता. यातून मधला मार्ग म्हणून गुरुपौर्णिमेची महती शिष्यांना ऑनलाइन पद्धतीने सांगितली. मात्र, ही सुविधा सर्वसामान्य भक्तांकडे नसल्याने गुरूंचे दर्शन कित्येकांना घेता आले नाही. पंढरपूर निवासिनी भागवताचार्या साध्वी अनुराधा यांनी आपल्या समाजबांधवांसह शिष्य दिव्यराधा सत्संग परिवाराला ऑनलाइन पद्धतीने प्रवचन सांगितले, तर मोबाइलवरच आपल्या गुरूंचे दर्शन घेत भक्तांना समाधान मानावे लागले.

कार्यक्रमाचे आयोजन दिव्यराधा सत्संग परिवाराकडून करण्यात आले होते. यात काही शिष्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनिल शेटे बीड, शिवाजी काटकर शिरूरकर, महारुद्र वीर, रवींद्र शिनगारे, सचिन भांडेकरसह शिष्य परिवार सहभागी झाला होता. सूत्रसंचालन अभय कुंभकर्ण यांनी केले होते. अवगुणांसहित स्वीकार करून तो अवगुण काढण्याचे काम करतात, त्याला गुरू म्हणतात. गुरूचे अंतःकरण विशाल असते. निष्काम भावनेने गुरूची सेवा माणसाचे आयुष्य बदलून टाकते. पौराणिक काळापासून आजपावेतो गुरूची प्रचीती येत असल्याचेही अनुराधा यांनी सांगितले.

260721\img-20210723-wa0069.jpg

भागवताचार्या साध्वी अनुराधा दिदी

Web Title: Loknayalaya and online Gurupournima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.