लॉकडाऊन शिथिल; पण काम मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST2021-06-20T04:23:25+5:302021-06-20T04:23:25+5:30
----------- बाजारात कच्चे खजूर, जर्दाळूची आवक बीड : येथील फळ बाजारात सध्या आंब्याची आवक वाढलेलीच आहे. ...

लॉकडाऊन शिथिल; पण काम मिळेना
-----------
बाजारात कच्चे खजूर, जर्दाळूची आवक
बीड : येथील फळ बाजारात सध्या आंब्याची आवक वाढलेलीच आहे. मात्र, केशर आंब्यांची आवक कमी झाली असून, बदाम, नीलम, आम्रपाली आंब्यांची आवक जास्त आहे. भावही आवाक्यात आहेत. त्याचबरोबर बाजारात कच्चे खजूर आणि जर्दाळू, आलूबुखारची आवक वाढली आहे.
------------
जारची मागणी घटली
बीड : मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता घटल्याने, तसेच चांगला पाऊस झाल्याने वातावरणात गारठा वाढला आहे. त्यामुळे तहान लागण्याच्या प्रमाणात घट होत आहे. त्यातच अतिथंड पाणी पिण्याचे अनेक जण टाळत आहेत. त्यामुळे जारच्या पाण्याची मागणीदेखील घटली आहे.
--------
रस्त्यावर मोठमोठे खड्डे
बीड : शहरातील जालना रोडवरून जुना मोंढा, एमआयडीसी व नव्या मोंढ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे असून, थोडा पाऊस झाला तरी तळे साचत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. मसरतनगर ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी आहे.
-----------
कारवाया थंडावल्या
बीड : कोरोना लॉकडाऊन काळात शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी वाहनधारकांवर कारवाया केल्या होत्या, तर रॅपिड अँटिजन टेस्टची मोहीम राबविण्यात आली होती. यातून पॉझिटिव्ह रुग्णही आढळत हाेते. आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले असले तरी वाहनांवरील कारवाया आणि कोराना चाचण्या करण्याची मोहीम थंडावली आहे.