अवकाळी पावसानंतर विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:27 IST2019-04-16T00:27:14+5:302019-04-16T00:27:29+5:30
बीड : सोमवारी दुपारी बीड शहरासह जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही वेळ पावसानंतर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, ...

अवकाळी पावसानंतर विजेचा लपंडाव
बीड : सोमवारी दुपारी बीड शहरासह जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही वेळ पावसानंतर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, विजेच्या लपंडावाचा सामना रात्री उशिरापर्यंत करावा लागला. सोमवारी दुपारी बीडसह जिल्हाभरात अवकाळी पाऊस झाला. धारुर तालुक्यात विज पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर परळी तालुक्यात एक बैल ठार झाला. दरम्यान, नागापूर येथील शेतकरी वीज अंगावर पडल्यामुळे जखमी झाला असून, त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर शेतकऱ्याचे नाव भारत आमटे असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बीडसह ग्रामीण भागामध्ये विजेचा लपंडाव सुरुच होता. मागील तीन दिवसांपासून तापमान तीव्र झाले होते. अवकाळी पावसामुळे मात्र दिलासा मिळाला आहे.