जिल्हा पोलीस दल सक्षम करू, गुन्हेगारांना धाक राहिला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:44+5:302021-06-23T04:22:44+5:30

बीड : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बीड जिल्हा पोलीस दलास आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ...

Let's enable the district police force, criminals should be feared | जिल्हा पोलीस दल सक्षम करू, गुन्हेगारांना धाक राहिला पाहिजे

जिल्हा पोलीस दल सक्षम करू, गुन्हेगारांना धाक राहिला पाहिजे

बीड : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बीड जिल्हा पोलीस दलास आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त पोलीस दलास सक्षम करण्यासाठी आवश्यक सर्वकाही संसाधने व आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देऊ. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा तसेच सर्वसामान्य लोकांना कायद्याचे राज्य आहे अशी जाणीव निर्माण व्हावी असे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा पोलीस दलास केले आहे.

बीड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १६५ वाहनांचे मंगळवारी दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना बीड पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, मा. आ. सुनील धांडे, मा.आ. सय्यद सलीम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी तसेच जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, सीईओ अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा, तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक ठाण्यात एक बीट अंमलदार महिला

जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत एक बीट अंमलदार या महिला असणार आहेत. अशी संधी बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच देण्यात आली आहे. याशिवाय ६ पिंक मोबाईल पथके महिला सुरक्षेसाठी विशेष स्थापन केली आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासह कोविड विषयक निर्बंधाचे पालन करण्यासाठी संपूर्ण पोलीस दल अविरतपणे कार्यरत असल्याबद्दल कौतुक करत पालकमंत्र्यांनी उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी प्रास्ताविक केले तर अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी आभार मानले.

जिल्हा पोलीस दलास मिळालेली वाहने

दुचाकी १५१

जीप ८

डायल ११२ पथकासाठी २ जीप, २ टियूव्ही वाहने

सर्व वाहनांची रंगीत परेड करून त्याद्वारे दुचाकी उभ्या करून डायल ११२ आकार साकारण्यात आला.

===Photopath===

220621\img_20210622_125051_14.jpg~220621\img_20210622_122837_14.jpg

Web Title: Let's enable the district police force, criminals should be feared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.