शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

'मराठवाड्यात चांगला पाऊस पडू दे'; प्रभू वैद्यनाथाला भाविकांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:53 IST

तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

परळी (बीड ) : श्रावणातील तिसऱ्या सोमवारीही श्री वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी परळी शहर, तालुक्यातील भाविकांसह राज्यभरातून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. दुपारपर्यंत हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. तिसरा सोमवार, संकष्ट चतुर्थी, तसेच जिल्हाधिकारी जाहीर सुटी यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे सव्वा लाख भाविकांनी वैद्यनाथ प्रभूचे दर्शन घेतल्याची माहिती आहे. 

राज्य व देशभरातून भाविक परळी शहरात दर्शनासाठी आले आहेत. चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, राज्यभरात मोठा पाऊस पडत असतांनाही बीडसह संपूर्ण मराठवाडा पावसाअभावी अजूनही कोरडाच असल्याने शेतकरी व नागरिकांकडून चांगल्या पावसाची श्री वैद्यनाथ चरणी प्रार्थना केली जात आहे. 

द्वादश ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील श्री वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी शिवभक्तांची तिसऱ्या श्रावण सोमवारी (दि.१९ ) मोठी गर्दी झाली होती. श्रावणातील प्रत्येक दिवस महत्वाचा असला तरी सोमवारी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान आज श्रावण सोमवारी परळी शहरात जणू काही शिवभक्तांची जत्राच भरल्याचे चित्र दिसून येत होते. त्यातच आज श्रावणातील तिसरा सोमवार असल्याने दुपारपर्यंत लाखो भाविकांनी वैद्यनाथ प्रभुंचे दर्शन घेतले. वैद्यनाथ देवस्थानच्यावतिने सचिव राजेश देशमुख व त्यांच्या सर्व विश्वस्त सहकाऱ्यांनी भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

वैद्यनाथ देवस्थानच्यावतिने भाविकांसाठी नेहमी प्रमाणेच स्त्री, पुरूष व पासधारक अशा स्वतंत्र रांगा ठेवण्यात आल्या आहेत.  पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आहे. आज वैद्यनाथ मंदिरातील सर्व पायऱ्या भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. गर्दीचा फायदा घेवून कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी मंदिराच्या पहिल्या पायरीपासून बाहेर पडण्याच्या दारापर्यंत जागोजागी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ओम नम: शिवाय, हर हर महादेव असा एकच गजर करीत भाविकांनी आपले मस्तक वैद्यानाथाच्या चरणी ठेवले. तसेच  चांगल्या पावसाची मागणी वैद्यनाथ प्रभूंकडे केली.

खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी घेतले दर्शनआज श्रावण सोमवारी बीडच्या खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी सकाळी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले . यावेळी त्यांनी वैद्यनाथ भगवानची मनोभावे पूजा व आरती केली. वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी खा. मुंडे यांचे स्वागत केले.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा