आष्टीच्या गर्भागिरी डोंगरात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:26+5:302021-08-28T04:37:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडा : तालुक्यात पुन्हा एकदा डोंगरदऱ्यात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. देवळाली येथे आठ दिवसांपूर्वी ...

आष्टीच्या गर्भागिरी डोंगरात बिबट्याचा वावर
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : तालुक्यात पुन्हा एकदा डोंगरदऱ्यात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. देवळाली येथे आठ दिवसांपूर्वी एका वासराचा फडशा पाडला आहे. यामुळे तो बिबट्याच आहे; पण उपद्रवी बिबट्या नसल्याचे वनविभाकडून सांगितले जात आहे.
आष्टी तालुक्यात ५ नोव्हेंबर रोजी गर्भगिरी डोंगरात एक मादी पकडली गेली. तेव्हा तिच्या शोधात असलेल्या नर जातीच्या बिबट्याने डरकाळ्या फोडत परिसरात तिचा शोध घेत होता. पण, पंधरा दिवसांत त्याला पाथर्डी तालुक्यात वनविभागाने जेरबंद केले. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुक्यात दर्शन देऊन २४ नोव्हेंबर रोजी सुर्डी येथील नागनाथ गर्जे, २७ नोव्हेंबर रोजी किन्ही येथील स्वराज भापकर या बालकांचा, तर पारगाव जोगेश्वरी येथील सुरेखा भोसले हिचादेखील जीव घेतला, तर चौघांजणावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. या घटनेची दहशत कमी होत नाही तोच पुन्हा चोभानिमगांव, बीडसांगवी, देवळाली, सावरगांव डोंगर परिसरात दर्शन देऊ लागल्याने नागरिक भयभीत होऊ लागले आहेत.
...
सतर्क राहण्याचे आवाहन
हा आढळून आलेला बिबट्या उपद्रवी नाही. तरी जंगलात व जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी जाऊ नये. सर्व नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी केले आहे.