आष्टी तालुक्यातील शेवटच्या टोकाचे व मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि मेहकरी नदीच्या काठावर वसलेल्या वाघळूज गावाची प्रचिती तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आहे
नेतृत्वाने गावाला मिळाली दिशा
बीड- आष्टी तालुक्यातील शेवटच्या टोकाचे व मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि मेहकरी नदीच्या काठावर वसलेल्या वाघळूज गावाची प्रचिती तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आहे. गाव काठावर असले तरी सर्वतोपरी विकास कामे होत आहेत. ब्रिटिशाच्या काळात या ठिकाणावरून जकात नाका घेतला जात होता. येथूनच सगळा कारभार हाकला जायचा. त्यामुळे गावची विशेषओळख बनली आहे. मराठवाड्याच्या शेवटच्या टोकाला असणार्या या गावाने जवळच लागून असणार्या लमाण तांड्यावरील प्रत्येक घरातील एक युवक हा पोलीस असून, प्रशासकीय नौकरीतही तरूणांनी आपला ठसा उमटवला आहे. स्व. बाजीराव राठोड हे ही याच गावचे डीवायएसपी होते. एकंदरीत गावाने सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला. माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली सभापती पती संतोषगुंड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पॅनलने ग्रा. पं. वर निर्विवाद वर्चस्व पटकावले आहे. निवडीनंतरच विकास कामे जोमात सुरू आहेत. सात सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये गावच्या एकोप्याने विकास कामात सातत्य राहिले आहे. या माध्यमातून आदर्श गावाकडे वाटचाल सुरू आहे. गावात तलाठी सज्जा कार्यालयाचे काम पूर्ण झाले असून, दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ते झाले आहेत. परिसरात बंधारे बांधण्याची कामे झाली असल्याने जलसिंचनास मदत होत आहे. महादेव मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाणीटंचाई भासू नये म्हणून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. निसर्गाच्या अवकृपेने यंदा टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. दरवर्षी कामानिमित्त अनेक मजुरांचे गावातून स्थलांतर होते. गावातच रोजगार उपलब्ध करून स्थलांतर रोखण्याचा ग्रा. पं. चा प्रयत्न आहे. कायमस्वरूपी पाणीपुरवठा राबवणार असल्याचा मानस पॅनलप्रमुख संतोषगुंडयांनी व्यक्त केला. विकास कामात ग्रामसेवक झगडे मॅडम यांचाही हातभार असतो. ग्रा. पं. च्या निवडणुकीत ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास अद्यापपर्यंत सार्थ ठरविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. विविध योजना राबविण्यासाठी माजी मंत्री सुरेश धस व संतोष गुंड यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे. स्थलांतर रोखण्यासाठी व युवकांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पाणीप्रश्न कायमचा मिटविण्यासाठी पाणी योजना राबविण्यात येणार आहे. उर्वरित काळात देखील ग्रामस्थांना विश्वासात व सदस्यांच्या मदतीने विकास साधला जाणार आहे. - विश्वनाथ भिवाजी क्षेत्रे, सरपंच गावात नव्याने तलाठी सज्जाच्या इमारतीचे काम झाले आहे. बीडपासून गावाचे अंतर किलोमीटर ■ संत कैकाडी महाराज व महादेव महाराज यांचा दरवर्षी नाम सप्ताह असून हाच यात्रोत्सव मानला जातो. दरवर्षी अखंडहरिनाम सप्ताहाचे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन केले जाते. याकरिता पंचक्रोशीतील भाविक भक्तांची हजेरी असते. गावात विविध मंदिरे आहेत. यात्रोत्सव ■ गावाचा खुंटलेला विकास करून चौफेर विकासाबरोबरच गावाचा नावलौकिक करण्याचा सर्वांच्या सहकार्याचा मानस आहे. गत अडीच वर्षात गावातील रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मूलभूत सोयीसुविधांबरोबर ग्रामस्थांना अद्यावत सुविधा ग्रा. पं. च्या वतीने देण्यात आल्या आहेत. प्रगती ■ मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून वाघळूज गावाची ख्याती आहे. ब्रिटिशांच्या काळात जकात नाका चौकी असल्याने वाघळूज हे नाव देण्यात आल्याची अख्यायिका आहे. प्राचीन काळातील विविध खाणाखुणा गाव परिसरात आजही पहावयास मिळतात. इतिहास ■ भविष्यात सी. सी. टी. चे काम, बांबंधिस्त बंधारे व कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवून गाव टंचाईमुक्त करण्याचा मानस आहे. गावात विविध प्रशासकीय योजना खेचून विकास कामे साधायची आहेत. सिमेंट रस्ते करून परिसरातील वाड्या, वस्त्या मुख्य प्रवाहात आणायच्या आहेत. यासाठी ग्रा.पं.चे प्रयत्न सुरू आहेत. आव्हाने साक्षरता शाळा सहकारी संस्था लोकसंख्या ६८१ (हे.) क्षेत्रफळ