कन्या प्रशालेत निबंध, वक्तृत्व स्पर्धेसह व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:37+5:302021-01-08T05:48:37+5:30
माजलगाव : येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व, निबंध स्पर्धा, व्याख्यान उपक्रमास ...

कन्या प्रशालेत निबंध, वक्तृत्व स्पर्धेसह व्याख्यान
माजलगाव : येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व, निबंध स्पर्धा, व्याख्यान उपक्रमास विद्यार्थिनींचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शंकर नवगणकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून मगरे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमात योगिता बिडवे, साक्षी घेणे, अंजली यादव, सुमन आगे या विद्यार्थिनींनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. निबंध स्पर्धेत ऐश्वर्या भुजंगे, अपर्णा शिंदे, सलोनी जमदाडे यांनी बक्षीस मिळवले. शिक्षक बाळासाहेब सोनसळे व जी.आर. घाटूळ यांनी ‘स्त्री शिक्षणाचे महत्त्व व सावित्रीबाई फुले’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी एक पुस्तक वाचण्याचा संकल्प केला. सूत्रसंचालन अनिता कुलकर्णी यांनी केले, तर शरद नायबळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनकर वाघमारे, संजय माने, बालासाहेब कांबळे, समुद्रे संगीता शिंदे, गोरख उघडे यांनी परिश्रम घेतले.