नांदेवाली येथे माझे गाव सुंदर गाव अभियानाचा शुभारंभ - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:33 IST2021-02-10T04:33:46+5:302021-02-10T04:33:46+5:30

यावेळी संपूर्ण गावातील विविध विकास योजनांची पाहणी करण्यात आली. तसेच अंगणवाडी, प्राथमिक शाळेची पाहणी करून मार्गदर्शन केले. या अभियानातून ...

Launch of My Village Beautiful Village Campaign at Nandewali - A | नांदेवाली येथे माझे गाव सुंदर गाव अभियानाचा शुभारंभ - A

नांदेवाली येथे माझे गाव सुंदर गाव अभियानाचा शुभारंभ - A

यावेळी संपूर्ण गावातील विविध विकास योजनांची पाहणी करण्यात आली. तसेच अंगणवाडी, प्राथमिक शाळेची पाहणी करून मार्गदर्शन केले. या अभियानातून ग्रामपंचायतीची करवसुली, वृक्ष लागवड, व्यामशाळा, अभिलेखा अद्यावतीकरण, परिसर स्वच्छतेच्या कामांना ग्रामपंचायत स्तरावर प्राधान्य दिले जाणार आहे. या अभियानात स्थानिक पातळीवर पदाधिकारी, ग्रामस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने चंद्रकांत राजहंस यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच ओमप्रकाश जोजारे, उपसरपंच सोनाली चंद्रकांत थिटे, ग्रामसेवक महादेव जाधव, गोवर्धन थिटे, मुख्याध्यापक गणेश मिसाळ, शिवाजी थिटे, सुदाम थिटे, विठ्ठल डोके, भगवान शेळके, गणेश शेळके, दादा भोसले, भारत कातखडे, गंगा लोणके, राम लोणके, सर्जेराव शिरपे, संजय लोणके, संजय भोसलेंसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन, प्रास्ताविक सुदाम थिटे यांनी केले.

Web Title: Launch of My Village Beautiful Village Campaign at Nandewali - A