शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गतवर्षीचे तूर, हरभऱ्याचे साडेचार कोटीचे चुकारे मिळणार कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:16 AM

अद्याप ४ कोटी २८ लाख ४८ हजार रुपयांचे वाटप बाकी असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संबंधित शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील हंगामात नाफेडमार्फत खरेदी केलेल्या हरभरा आणि तुरीचे जवळपास २४० कोटी रुपये शेतक-यांना अदा करण्यात आले असून अद्याप ४ कोटी २८ लाख ४८ हजार रुपयांचे वाटप बाकी असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संबंधित शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकलेली नाही.मागील २०१७-१८ हंगामात नाफेडमार्फत जिल्ह्यातील १५ खरेदी केंद्रावर २ लाख २१ हजार ७२४. ८७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती. हमीदर ५ हजार ४५० रुपये प्रतीक्विंटल होता. १ डिसेंबरअखेर शेतक-यांना ११९ कोटी ९१ लाख ९५ हजार १९८ रुपयांचे पेमेंट अदा करण्यात आले. तर ९२ लाख ५ हजार ३४३ रुपये शेतक-यांना अदा करणे बाकी आहे.तसेच २ लाख ९६ हजार ८८६. ८६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला होता. हमीभाव ४४०० रुपये प्रती क्विंटल होता. हरभरा विक्रीस घातलेल्या शेतक-यांना १२७ कोटी २६ लाख ५९ हजार ४३ रुपयांचे पेमेंट अदा करण्यात आलेले आहे. तर ३ कोटी ३६ लाख ४३ हजार १४१ रुपये अदा करणे बाकी आहे.जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, पाटोदा, कडा, केज, धारुर, शिरुर, परळी, वडवणी, अंबाजोगाई, आष्टी, पारनेर, बर्दापूर, माजलगाव एपीएमसी अशा १५ केंद्रांवर तूर आणि हरभ-याची खरेदी केली होती. खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन पेमेंट वाटपाची कार्यवाही सुरु झाली. सात महिन्यानंतरही सुमारे ४ कोटी २८ लाख ४८ हजार ४८४ रुपये शेतक-यांना वाटप होणे बाकी आहे. पेमेंट वाटप गतीने करण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे. यंदाच्या वर्षी उत्पादनात झालेली घट लक्षात घेता बाजारात तेजी येऊ शकते. त्यामुळे केंद्रांवर माल आणताना शेतकरी बाजाराचाही विचार करीत आहेत.यंदाची खरेदी संथ गतीने सुरुबीड जिल्ह्यात यावर्षी नाफेडमार्फत १९ खरेदी केंद्रांवर ३७ दिवसात मूग आणि उडदाची एकूण ९ हजार ९७६ क्विंटल खरेदी झाली आहे. मूगासाठी नोंदणी केलेल्या श्ेतक-यांचे प्रमाण पाहता दहा टक्के शेतकºयांच्या मूगाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात उडीद, मूग आणि सोयाबीन खरेदीसाठी केंद्र निश्चित केल्यानंतर नोंदणी सुरु झाली. आक्टोबरच्या तिस-या आठवड्यात खरेदी सुरु झाली.जिल्ह्यातील १० हजार ९६८ शेतकºयांनी मूग विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली. २ हजार १२७ शेतक-यांचा ९ हजार ८१३. ५० क्विंटल मूग १९ केंद्रांवर खरेदी करण्यात आला. तर उडदासाठी ९५९ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ५१ शेतक-यांचा १६३ क्ंिवटल उडीद खरेदी करण्यात आला. सोयाबीनसाठी ६५८ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली. या सर्व शेतक-यांना एसएमएस पाठविण्यात आले. परंतू ३ डिसेंबरपर्यंत एकाही शेतक-याने सोयाबीन विक्रीसाठी आणलेले नव्हते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी