उपवासाच्या साहित्याची मोठी विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:08+5:302021-07-21T04:23:08+5:30
शाळेच्या वाटा अजूनही बंदच शिरूर कासार : आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असली तरी त्या ...

उपवासाच्या साहित्याची मोठी विक्री
शाळेच्या वाटा अजूनही बंदच
शिरूर कासार : आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असली तरी त्या सुरू करण्यासाठी किमान एक महिना गावात कोरोना रुग्ण नसावा, असे सांगितले गेल्याने बहुतांश शाळेतील वाटा बंदच असल्याचे दिसून येते.
शिरूर तालुक्यात कोरोना पाय पसरतोय
शिरूर कासार : तालुक्यात कोरोनाची संख्या घटत जाऊन ती अवघी चारवर आली होती. मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यात तब्बल ४२ रुग्ण निघाले असल्याने सावधच राहण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी गर्दीवर नियंत्रण महत्त्वाचे आहे आणि नेमके याच गोष्टीचे नागरिक भान ठेवत नसल्याचे दिसत आहे. दंडात्मक कारवाईचा सिलसिला सुरूच आहे. नागरिकांनी अजून तरी सावध राहण्याची गरज असल्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाते.
ब्रह्मकमळाने विठूरायाची पूजा
शिरूर कासार : आषाढी एकादशी महापर्वणी काळात ब्रह्मकमळाला तब्बल ४० फुलांचा बहर आला होता. हा दुर्मीळ योग आणि पंढरपूरची महावारी म्हणून आमच्या घरी उमललेल्या चाळीस सुगंधी फुलांनी विठूरायाबरोबर माउली ज्ञानराजांचीही पूजा करून वारीचा आनंद घरीच घेतल्याचे अनिल गाडेकर, डॉ. मधुसूदन खेडकर यांनी सांगितले.
200721\img20210719221044.jpg
फोटो