लॅपटॉप, मोबाइल चोरणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:33 IST2021-04-18T04:33:17+5:302021-04-18T04:33:17+5:30
उदयराज गजेंद्र भोसले (रा. पौंडूळ तांडा, ता. सोनपेठ, जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. एका महिन्यापूर्वी दिंद्रुड ...

लॅपटॉप, मोबाइल चोरणारा अटकेत
उदयराज गजेंद्र भोसले (रा. पौंडूळ तांडा, ता. सोनपेठ, जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. एका महिन्यापूर्वी दिंद्रुड गावालगत असलेल्या वजन काट्यावरील दोन मोबाइल आणि एक लॅपटॉप घेऊन आरोपी उदयराज भोसले फरार झाला होता. त्याच्यावर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असताना आरोपी सोनपेठ येथे असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत यांना मिळाली होती. त्यांनतर पोउनि. भगत दुल्लत व त्यांचे पथक आरोपीच्या मागावर पाठवले होते. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनपेठ येथून आरोपी उदयराज भोसले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून दोन मोबाइल व लॅपटॉप असा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी दिंद्रुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.