जमीन घोटाळा, आणखी एक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:41 IST2021-09-09T04:41:16+5:302021-09-09T04:41:16+5:30

तालुक्यातील रुई नालकोल येथील देवस्थानची सर्व्हे क्र. ७५, ७६, ७७, ८१ अ, ८१आ मधील शंभर एकर जमीन ...

Land scam, another arrest | जमीन घोटाळा, आणखी एक अटकेत

जमीन घोटाळा, आणखी एक अटकेत

तालुक्यातील रुई नालकोल येथील देवस्थानची सर्व्हे क्र. ७५, ७६, ७७, ८१ अ, ८१आ मधील शंभर एकर जमीन ७ कुटुंबप्रमुखांच्या नावे सातबारावर वंशपरंपरेने आहे. बनावट दस्तऐवज तयार करून जमीन बळकावल्याची बाब समोर आली होती. आष्टी ठाण्यात आदिनाथ त्रिंबक बोडखे, सुरेश गहिनीनाथ बोडखे ,गोपीनाथ पांडुरंग बोडखे, शेख मुस्ताक बादशाह यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आदिनाथ त्रिंबक बोडखे, गोपीनाथ पांडुरंग बोडखे, संजय नालकोल व शरद पवार या चाैघांना आष्टी पोलिसांनी अटक केली आहे, तर प्रा. मुस्ताक पानसरे व सुरेश बोडखे हे दोन आरोपी फरार होते. बुधवारी मुख्याध्यापक सुरेश बोडखे याला गजाआड करण्यात आले.

Web Title: Land scam, another arrest