भूमी अभिलेख कार्यालयाचे पाच वर्षांपासून ऑडिटच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST2021-04-05T04:29:27+5:302021-04-05T04:29:27+5:30
बीड : येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे सन २०१६ पासून लेखा परीक्षणच झालेले नाही. किरण नन्नावरे यांनी टाकलेल्या ...

भूमी अभिलेख कार्यालयाचे पाच वर्षांपासून ऑडिटच नाही
बीड : येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे सन २०१६ पासून लेखा परीक्षणच झालेले नाही. किरण नन्नावरे यांनी टाकलेल्या माहिती अधिकारातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत प्रधान सचिवांकडे तक्रारही करण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी माहिती अधिकार अर्ज देऊन लेखा परीक्षणाची माहिती मागविली होती. यावर जनमाहिती अधिकारी यांनी १९ फेब्रुवारी यांनी कार्यालयाचे लेखा परीक्षण झाले नसल्याचे लेखी कळवले आहे. ही बाब महाराष्ट्र शासनाच्या, राज्यपाल यांच्या आदेशाच्या विरूद्ध कामकाजाची भूमिका दिसत असून, महसूल विभागातील महत्त्वाचे कार्यालय असून, या कार्यालयाकडे वरिष्ठांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची शंकाही नन्नावरे यांनी व्यक्त केली. तसेच लेखा परीक्षण व अंतर्गत लेखा परीक्षण का झाले नाही, याची सखोल चौकशी करुन संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा १९७९ कायद्यानुसार व अन्य कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही प्रधान सचिवांकडे केली आहे. याबाबत त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, जमाबंदी आयुक्त, पुणे, महालेखापाल नागपूर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद, जिल्हाधिकारी, बीड या सर्वांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीमुळे भूमी अभिलेख कार्यालयाचे धाबे दणाणले आहेत.
कोट
लेखा परीक्षणासंदर्भात माहिती मागविली होती. परंतु, येथील जनमाहिती अधिकाऱ्यांनी २०१६ पासून लेखा परीक्षणच झाले नसल्याचे लेखी कळविले. त्यामुळे या कार्यालयात मोठा घोळ झाल्याचा संशय आहे. याबाबत प्रधान सचिव व मंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत.
किरण नन्नावरे, माहिती अधिकार कार्यकर्ते, पाडळसिंगी
===Photopath===
040421\042_bed_1_04042021_14.jpeg
===Caption===
किरन नन्नावरे