जमीन, जोडणी नाही, तरीदेखील कृषिपंपाचे सव्वालाख वीज बिल भूमिहीन शेतकऱ्याच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:42+5:302021-01-08T05:48:42+5:30

नांदूरघाट : महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ समोर येऊ लागला आहे. ज्या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीकडे वीज कोटेशन भरले. ...

Land, no connection, yet all the electricity bill of the agricultural pump is on the landless farmer | जमीन, जोडणी नाही, तरीदेखील कृषिपंपाचे सव्वालाख वीज बिल भूमिहीन शेतकऱ्याच्या माथी

जमीन, जोडणी नाही, तरीदेखील कृषिपंपाचे सव्वालाख वीज बिल भूमिहीन शेतकऱ्याच्या माथी

नांदूरघाट : महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ समोर येऊ लागला आहे. ज्या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीकडे वीज कोटेशन भरले. वीज जोडणी मिळेना म्हणून परेशान होऊन जमीन विक्री केली व भूमिहीन झाला. तरीसुद्धा वीज न जोडता महावितरण कंपनीने कृषिपंपाचे लाइट बिल शेतकऱ्याच्या माथी मारल्याचे समोर आले आहे.

नांदूरघाटमधील सर्व्हे नंबर ४४ या ठिकाणी २०१० ला दत्ता वैजनाथ जाधव या युवक शेतकऱ्याने एक एकर शेती विकत घेतली. एक एकर बागायती करण्यासाठी २०१४-१५ ला कोटेशन ७००० रुपये भरले. त्या शेतात वीज जोडण्यासाठी सात पोल व वीज तार आवश्यक होती. शासनाच्या नियमाप्रमाणे कोटेशन पूर्ण भरले. वारंवार पाठपुरावा करूनदेखील वीज कंपनीने वीज जोडणी केलीच नाही किंवा साधे पोलसुद्धा मोकळे उभे केले नाहीत. शेवटी हताश होऊन वैतागून शेतकरी दत्ता यांनी २०१६ ला जमीन होती तेवढी विकली व दत्ता भूमिहीन झाले. हॉटेलचा छोटा व्यवसाय करून उपजीविका भागू लागले. एवढे होऊन २०१७ मध्ये वीज वितरण कंपनीने दत्ता यांना ५६८५० रुपये दिले. यावर वरिष्ठांना बोलून व पूर्ण कैफियत वर्तमानपत्रात १४ नोव्हेंबर १७ रोजी मांडून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. यावर वरिष्ठांनी चुकून झाले, दुरुस्त होऊन जाईल असे सांगितले. एवढे होऊन डिसेंबर २०२० मध्ये आणखी वीज वितरण कंपनीचे लोक दत्ता जाधव यांच्याकडे आले व तुमच्या शेताचा सर्व्हे करायचा आहे, बिल खूप थकले आहे. गुन्हा दाखल होईल पैसे भरा असे सांगितले. तुम्हाला १२५४१० रुपये वीज बिल आले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत भरून घ्या, असे सांगितले. हे सर्व पाहून व बोलणे ऐकून दत्ता यांची मनस्थिती खराब झाली. ज्या जमिनीसाठी कोटेशन भरले ते कोटेशन परत दिलेच नाही, तेथे लाइट नाही व जोडणी नाही. चार वर्षे झाले. वैतागून जमीन विकली, तरीपण वीज बिल आलेच कसे, या प्रश्नाने दत्ता यांचे मानसिक संतुलन अस्थिर झाले. याला जबाबदार असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी व कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जाधव कुटुंबियांनी केली आहे.

मला वीज कधी दिली नाही, माझे भरलेले कोटेशन परत दिले नाही. वैतागून जमीन चार वर्षांपूर्वी विकली. आता तर सव्वालाख बिल माझ्या नावे आले आहे, मला न्याय हवा.

-दत्ता वैजनाथ जाधव, नांदूरघाट

त्या शेतकऱ्याला नांदूरघाट येथील ऑफिसला अर्ज द्यायला सांगा. वीज जोडली नाही; परंतु बिल आले म्हणून अर्ज द्या. आम्ही कार्यवाही करतो. बिल बंद करून टाकू व आलेली रक्कम माफ करून टाकू. या सर्व प्रकरणाची मी स्वतः चौकशी करून त्या शेतकऱ्याला न्याय देईन.

-आंबेकर (अभियंता, केज)

Web Title: Land, no connection, yet all the electricity bill of the agricultural pump is on the landless farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.