चिंचपूर देवस्थानची जमीन बळकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:08+5:302021-07-03T04:22:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील देवस्थानची २२ हेक्टर ४९ गुंठे जमीन खोटे कागदपत्रे बनवून त्याची ...

चिंचपूर देवस्थानची जमीन बळकावली
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील देवस्थानची २२ हेक्टर ४९ गुंठे जमीन खोटे कागदपत्रे बनवून त्याची खरेदी-विक्री केली. याप्रकरणी आष्टी येथील दोन जणांविरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
चिंचपूर येथील देवस्थानची २२ हेक्टर ४९ गुंठे इनामी जमीन आहे. या जमिनीचे देखभाल म्हणून इर्शान नवाब खान व असलम नवाब खान हे देखभाल करीत होते. परंतु सदरील दोन्ही व्यक्तींनी या इनामी जमिनीच्या ७/१२ व ८-अ वर देवस्थानचे नाव कमी करून स्वतःचे लावून जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतरित केली. तसेच उपजिल्हाधिकारी सामान्य व भू-सुधार यांच्याकडे प्रकरण दाखल करून सदरील जमीन मदतमाश............... असल्याचे घोषित करून खालसा केली. तसेच खोटे दस्तऐवज तयार करून सदरील जमिनीची खरेदी-विक्री केली, अशी फिर्याद बीडचे जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी दिली. यावरून इर्शान नवाब खान व असलम नवाब खान यांच्या विरोधात शुक्रवारी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे करीत आहेत.