एटीम कार्डचा वापर करून रोकड केली लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:50 IST2021-01-08T05:50:37+5:302021-01-08T05:50:37+5:30
विष्णुपंत सुखदेव घोडके (रा. छत्रपती कॉलनी, बीड) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. २६ डिसेंबर रोजी दुपारी १२ ...

एटीम कार्डचा वापर करून रोकड केली लंपास
विष्णुपंत सुखदेव घोडके (रा. छत्रपती कॉलनी, बीड) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. २६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता ते पैसे काढण्यासाठी बीड शहरातील स्वराज्य नगर येथील एका एटीएममध्ये गेले होते. त्या ठिकाणी गर्दीत त्यांच्या खिशातून त्यांचे एटीएम कार्डखाली पडले. लक्षात राहण्यासाठी विष्णुपंत यांनी कार्डवर पिन नंबर लिहून ठेवला होता. त्यानंतर २७ आणि २८ डिसेंबर या दोन दिवसात अज्ञात चोरट्याने बालेपीर (बीड), वडवणी आणि अंबाजोगाई येथील विविध एटीएममधून त्यांच्या कॅनरा बँकेच्या खात्यातून एकूण ६१ हजार रुपये काढून घेतले. विष्णुपंत यांच्या खात्याला चालू मोबाइल क्रमांक जोडलेला नसल्याने त्यांना पैसे काढल्याचे लक्षात आले नाही. बुधवारी पैसे काढण्यासाठी गेले असता, खात्यातून रक्कम लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले व अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउपनि मिना तुपे या करत आहेत.