लाइनमनअभावी विजेची कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST2021-08-17T04:39:10+5:302021-08-17T04:39:10+5:30
----------------------------------- दुधाचे दर वाढवा अंबाजोगाई : वाढत्या महागाईमुळे सरकी पेंडीचे भाव गगनाला भिडल्याने दूध उत्पादक संकटात सापडले आहेत. ...

लाइनमनअभावी विजेची कामे रखडली
-----------------------------------
दुधाचे दर वाढवा
अंबाजोगाई : वाढत्या महागाईमुळे सरकी पेंडीचे भाव गगनाला भिडल्याने दूध उत्पादक संकटात सापडले आहेत. शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी गायी, म्हशी, शेळ्या आदी जनावरे सांभाळतात. मात्र वाढत्या महागाईमुळे हा व्यवसाय डबघाईस येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला शासनाने दर वाढवून द्यावेत. अशी मागणी त्यांनी केली आहे.
---------------------------------
पालकांच्या अडचणी वाढल्या
अंबाजोगाई : या वर्षीही शाळा सुरू झाल्या नसून बहुतांश शाळांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. शेती हंगामाचे दिवस आहेत. त्यातच आर्थिक अडचण असतानाही मुलांना मोबाइल घेऊन देण्याची वेळ पालकांवर आली आहे. त्यामुळे शाळांनीच मोबाइल पुरवावा, अशी मागणी पालक करीत आहेत.
----------------------------------
दिव्यांगांसाठी विशेष पदभरतीची मागणी
अंबाजोगाई : आयटीआय व जीटीआयमध्ये दिव्यांगांसाठी विशेष पदभरती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कोंबडे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात दिव्यांगांसाठी आयटीआय व जीटीआयमध्ये नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र दिव्यांगांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे राज्यात तातडीने दिव्यांगांसाठी आयटीआय व जीटीआयमध्ये विशेष पदभरती मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
---------------------------------
पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी
अंबाजोगाई : शहरातील अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी काही युवक मोकळ्या जागांमध्ये बसून धिंगाणा करणे, आरडाओरड करणे, असे प्रकार करत आहेत. तसेच युवकांचे वाढदिवस एकत्रित येत रस्त्यावर साजरे करण्याच्या प्रकारामध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.