ग्रामस्वच्छता अभियानाचा कुसळंबला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:45+5:302021-02-05T08:24:45+5:30
कुसळंब : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये २०१८-१९ च्या तपासणीनंतर जाहीर निकालानुसार बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ...

ग्रामस्वच्छता अभियानाचा कुसळंबला पुरस्कार
कुसळंब : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये २०१८-१९ च्या तपासणीनंतर जाहीर निकालानुसार बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कुसळंब ग्रामला प्रदान करण्यात आला. प्रजासत्ताकदिनी सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला.
सन २०१८-१९ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये कुसळंबने सहभाग घेतला होता. यावेळी शासनाच्या संबंधित तपासणी समितीने गावचे मूल्यमापन केले होते. यात कुसळंबला बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा (विभागून) बहुमान मिळाला. प्रजासत्ताकदिनी हा पुरस्कार देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या स्वाक्षरीने हे सन्मानपत्र कुसळंबचे सरपंच व प्रतिनिधींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. ही सन्मानाची परंपरा अखंड चालू ठेवण्यासाठी विकासाची झेप अशीच सुरू ठेवणार असल्याचे सरपंच अर्चना शिवाजीराव (मेजर) पवार यांनी सांगितले.