के.एस.के. महविद्यालयात दोन दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:29+5:302021-02-05T08:25:29+5:30
शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर होत्या. या शिबिराच्या आयोजना मागील भूमिका डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी मांडली. या ...

के.एस.के. महविद्यालयात दोन दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण
शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर होत्या. या शिबिराच्या आयोजना मागील भूमिका डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी मांडली. या शिबिरामध्ये पुणे येथील महेश आय्यर (जम्प स्टार्ट पुणे) यांनी दोन दिवस मार्गदर्शन केले. आय्यर यांनी शैक्षणिक क्षेत्रात कम्युनिकेशनचे महत्त्व, विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक कौशल्य विकसित करणे, विद्यार्थ्यांची मानसिकता समजून, त्यांच्या सोबत संभाषण करणे, विद्यार्थ्यांना करिअरबद्दल जागरूक करणे आणि कोविड-१९ परिस्थितीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी महाविद्यालयातील एकूण ६० प्राध्यापक सहभागी झाले होते. शिबिराचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सोनाजी गायकवाड यांनी केले.या शिबिरासाठी संस्थेचे प्रशासक डॉ. राजा मचाले, उपप्राचार्य डॉ.ए.एस. हांगे, उपप्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. रेखा गुळवे, कमवि उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.