शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'हाच तो सरपंच, आपल्या पोरांना आडवा आला होता'; 'मोकारपंती' ग्रुपवर चार व्हिडीओ कॉल, काय झालं होतं बोलणं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 20:54 IST

Santosh Deshmukh Videos And Photos: संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केले आहे, त्यातून दररोज नवीन माहिती समोर येत आहे. देशमुखांना मारहाण करताना त्या ग्रुपवर चार वेळा कॉल करण्यात आला होता.

Santosh deshmukh Video: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे व्हायरल झालेले काही कथित फोटो पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. परंतु हा सर्व प्रकार फरार कृष्णा आंधळे याने 'मोकारपंती' व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडीओ कॉल करून दाखवत क्रूरतेचा कळस गाठला. सहा जणांनी तो कॉल उचलल्याने त्यांनी ही क्रूर घटना 'लाइव्ह' पाहिल्याचे गेल्याचे समोर येत आहे. सीआयडीच्या दोषारोपपत्रातून ही माहिती समोर आली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले. त्यानंतर आधी वाहनात आणि नंतर खाली उतरवून पाइप, वायर आणि इतर हत्यारांनी संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केली. याचे फोटोही आरोपींनी काढले. 

त्यानंतर सायंकाळी ५:४६ वाजता कृष्णा आंधळे याने 'मोकारपंती' या व्हॉट्सअॅपवर ग्रुपवर व्हिडीओ कॉल केला. कधी १७ सेकंद, तर कधी ३० मिनिटे देशमुख यांना मारहाण करताना दाखविल्याचे आरोपपत्रात उल्लेख केलेला आहे. या ग्रुपमधील सहा जणांनी हा कॉल उचलला होता, असे समजते. सीआयडीने त्यांचेही जबाब घेतले आहेत.

संतोष देशमुख हत्या: कधी कधी करण्यात आले कॉल?

दिवस - ९ डिसेंबर २०२४

पहिला व्हिडीओ कॉल - ५ वाजून १४ मिनिटांनी - ४४ सेकंद

दुसरा व्हिडीओ कॉल - ५ वाजून १६ मिनिटांनी - ४५ सेकंद

तिसरा व्हिडीओ कॉल - ५ वाजून १९ मिनिटांनी - २.०३ मिनिटं

चौथा व्हिडीओ कॉल - ५ वाजून २६ मिनिटांनी - २.४४ मिनिटं 

'लई मारला, आता सरपंचाला मारायचं बास करा'

आरोपी कृष्णा आंधळे याने त्याच्या मोबाईलमधून या ग्रुपवर हे कॉल केले होते. त्यातील एका कॉलमध्ये कृष्णा आंधळे हा जखमांनी रक्तबंबाळ झालेल्या संतोष देशमुखांचा चेहरा व्हिडीओ कॉलवरून ग्रुपमधील इतरांना दाखवत आहे. 

त्यानंतर कृष्णा आंधळे ग्रुपमधील इतरांना म्हणतो की, 'हाच तो मस्साजोगचा सरपंच आहे. त्या दिवशी सुदर्शन भय्याला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता.' त्यानंतर कृष्णा आंधळे तीन वेळा मोबाईलचा कॅमेरा संतोष देशमुखांच्या चेहऱ्याजवळ नेतो. त्यात देशमुखांच्या चेहऱ्यावरील जखमांमधून रक्त येताना दिसत आहे. 

त्यानंतर ग्रुपमधील एकजण कृष्णा आंधळेला म्हणतो, 'वाघ्या, लई मारला आहे. आता बास करा त्या सरपंचाला मारायचे.'

फरार कृष्णा आंधळेची वाहने होणार जप्त

सरपंच हत्येपासून आठवा आरोपी कृष्णा आंधळे हा मोकाटच आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरूच आहे. परंतु त्याच्याकडे असलेली पिकअप, ट्रक, दोन दुचाकी आणि एक कार जप्त केली जाणार आहे. न्यायालयाने यासंदर्भात आदेश केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सरपंच हत्या, खंडणी आणि मारहाण व अॅट्रॉसिटी असे तिन्ही प्रकरणे आता बीडच्या विशेष मकोका न्यायालयातच चालणार आहेत.

कराडकडे दीड हजार कोटीची संपत्ती

मास्टरमाइंड वाल्मीक कराड याच्याकडील संपत्तीचा अहवालही सीआयडीने दोषारोपपत्रात दाखल केला आहे.यात महागड्या वाहनांसह भूखंड आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. परंतु त्याचा एकत्रित आकडा समोर आला नाही. आ. रोहित पवार यांनी मात्र, कराडकडे दीड हजार कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा दावा केला आहे.

घुले म्हणतो, 'अण्णांची मागणी पूर्ण कर'

वाल्मीक कराड याच्याकडील तीन आयफोन पोलिसांनी जप्त केले. त्यातील डाटाही रिकव्हर करण्यात आला आहे. यात सुदर्शन घुले हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मीक अण्णांची मागणी पूर्ण कर.त्यानंतर तुला कसलीच अडचण येणार नाही, असे चित्रीत झाल्याचेही सांगण्यात आले. हे सर्व पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले आहेत.

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपBeed policeबीड पोलीसBeedबीड