सनगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:04+5:302021-06-25T04:24:04+5:30
लोखंडी सावरगाव : अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ...

सनगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह
लोखंडी सावरगाव : अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी शरद शिनगारे, तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने सनगाव येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन केले आहे.
यात पीक उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने रुंद वरंबा-सरी तंत्रज्ञान बीज प्रक्रिया, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार १० टक्के रासायनिक खत बचत यावर कृषी विभागातर्फे मार्गदर्शन केले जात आहे. पोखरा प्रकल्पांतर्गत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या फळबाग लागवड, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेडनेट तसेच शेतकरी बचत गट व शेतकरी उत्पादक कंपनी योजनांची माहिती देऊन अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे, संजय मुंडे, ग्रामसेवक नारायण पवार, कृषी सहायक दगडू रांजणकर, व्यंकटी चव्हाण, ज्ञानोबा लाखे, दत्तात्रय अंजान, अंकुश उबाळे, भिकाजी चव्हाण, अवधूत जाधव, मधुकर उबाळे, श्रीधर अंजान व शेतकरी उपस्थित होते.