आष्टी तालुक्यात सर्वत्र क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:33+5:302021-01-04T04:27:33+5:30

शहरातील महात्मा फुले चौकामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस ...

Krantijyoti Savitribai Phule Jayanti everywhere in Ashti taluka | आष्टी तालुक्यात सर्वत्र क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती

आष्टी तालुक्यात सर्वत्र क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती

शहरातील महात्मा फुले चौकामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस अजय धोंडे, रंगनाथ धोंडे, सुरज शिंदे, सुनील रेडेकर,अक्षय सायकड,अजित मुळे,अक्षय धोंडे,सोमा साखरे आदींनी अभिवादन केले. तहसील कार्यालय,पंचायत समिती,नगरपंचायत,ग्रामपंचायत,पंडित नेहरू विद्यालय,कन्या शाळा,गांधी महाविद्यालय,विविध शासकीय कार्यालयांसह कडा, धानोरा, धामणगाव आदी गावात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविका,मदतनीसांचा गौरव

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आष्टी कार्यालयात उध्दव सानप , बाल विकास प्रकल्प अधिकारी आष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विस्तार अधिकारी एन.एस.राऊत , आर.सी.खोड पर्यवेक्षिका वाघमारे ए.डी. , ससाणे ए.बी. , करंजकर व्हि.जे. , जाधव एस.के. , देशमुख के.जे. , अमृता हाटटे , एम.एस.आजबे , एम.एस.वांढरे , राठोड ए.एस. , क्षिरसागर पी.एस. , प्रकल्प समन्वयक शिवाजी गुळभिले व अंगणवाडी सेविका , मदतनीस उपस्थित होत्या. या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पर्यवेक्षिका , अंगणवाडी सेविका , मिनी सेविका , मदतनीस यांचा कोविड योध्दा म्हणून गौरव करण्यात आला . मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी म्हणून मातांमध्ये जागरुकता पोषण आहारासंबंधी प्रबोधन करण्यात आले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी एन.एस.राऊत यांनी केले. ए.डी.वाघमारे यांनी आभार मानले.

Web Title: Krantijyoti Savitribai Phule Jayanti everywhere in Ashti taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.