यशवंत हॉस्पिटलला पुन्हा कोविडची मान्यता; पूर्वी केलेल्या सेवेची शासनाकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:20+5:302021-03-21T04:32:20+5:30
कोरोनाच्या पहिल्या टप्प्याचा वाढता धोका पाहता, माजलगावमध्ये कुणीच कोरोना हॉस्पिटल चालवण्यास धजावत नसताना येथील यशवंत राजेभोसले यांनी बीड जिल्ह्यात ...

यशवंत हॉस्पिटलला पुन्हा कोविडची मान्यता; पूर्वी केलेल्या सेवेची शासनाकडून दखल
कोरोनाच्या पहिल्या टप्प्याचा वाढता धोका पाहता, माजलगावमध्ये कुणीच कोरोना हॉस्पिटल चालवण्यास धजावत नसताना येथील यशवंत राजेभोसले यांनी बीड जिल्ह्यात पहिल्यांदा कोविड हॉस्पिटल सुरू करून अनेक कोरोना रुग्णांना जीवदान दिले आहे. विशेष म्हणजे या कोविड हॉस्पिटलमध्ये बीड जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील शेकडो रुग्णांनी उपचार घेतले आहेत. तसेच यशवंत हॉस्पिटलचे यशवंत राजेभोसले यांनी केन्द्र शासनाच्या आयुष मंत्रालय, दिल्ली यांनी घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करत रुग्णसेवा केली. त्यामुळे पुन्हा शासनाने यशवंत हॉस्पिटलच्या मालिपारगाव येथे कोविड हॉस्पिटलला मान्यता दिल्याने माजलगाव तालुक्यासह अन्य ठिकाणच्या कोरोना रुग्णांची सोय होणार आहे.
आपत्ती व्यवस्थेच्या काळात शासनाला पूर्ण सहकार्य करण्यात आले. शासनाने दिलेली पूर्ण जबाबदारी तंतोतंत पाळू तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रुणांवर उपचार केले जातील.
यशवंत राजेभोसले -
यशवंत हॉस्पिटल, माजलगाव