कोळगावच्या तरुणाचा लोणावळ्यात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST2021-02-13T04:33:37+5:302021-02-13T04:33:37+5:30
गेवराई : तालुक्यातील कोळगाव येथील कृषी विक्रेता प्रकाश जगन्नाथ येढे (३५) यांचा लोणावळ्यातील एका हाॅटेलमध्ये मृत्यू झाल्याची घटना ...

कोळगावच्या तरुणाचा लोणावळ्यात मृत्यू
गेवराई : तालुक्यातील कोळगाव येथील कृषी विक्रेता प्रकाश जगन्नाथ येढे (३५) यांचा लोणावळ्यातील एका हाॅटेलमध्ये मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्यांचे बी-बियाणे, खते, औषधे विक्रीचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी एका खासगी औषध कंपनीने काही दुकानदारांना फिरण्यासाठी लोणावळा टूर काढली होती. यामध्ये प्रकाश येढे यांचा समावेश होता. टूरवर गेलेले हे दुकानदार लोणावळा येथील एका हाॅटेलमध्ये मुक्कामाला होते. तर प्रकाश येढे व अन्य काही जण हे सदरील हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी प्रकाश येढे हे डोक्याला गंभीर मार लागून मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, प्रकाश येढे यांचा मृत्यू हा गॅलरीतून पडल्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रकाश येढे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.