मजूर दाम्पत्याचे अपहरण; सात जणांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:22 IST2017-11-24T00:22:06+5:302017-11-24T00:22:14+5:30
बीड : मजूर दाम्पत्यास जबरदस्तीने जीपमध्ये बसवून पळवून त्यांना घरात डांबून ठेवत मारहाण केली. तसेच दहा हजार रूपये काढून ...

मजूर दाम्पत्याचे अपहरण; सात जणांविरूद्ध गुन्हा
बीड : मजूर दाम्पत्यास जबरदस्तीने जीपमध्ये बसवून पळवून त्यांना घरात डांबून ठेवत मारहाण केली. तसेच दहा हजार रूपये काढून घेतले. पोलिसांत धाव घेतली, परंतु त्यांनी गुन्हा नोंद केला नाही. मजूर दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतल्यानंतर माजलगाव ग्रामीण ठाण्यात सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
माजलगाव तालुक्यातील मंगरूळ येथील भगवान साबळे (रा.बोरखेड ता. शेनगाव जि.हिंगोली) हे पत्नी वत्सला सह थांबले होते. एवढ्यात नारायण काळे, सारिका काळे, त्यांचा मुलगा व इतर चौघे पांढºया रंगाच्या जीपमधून आले. त्यांनी या दोघांना जीपमध्ये बसवून नेत एका घरात डांबून ठेवले. तेथे त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. यातून कशीबशी सुटका करीत ते पोलीस ठाण्यात गेले. परंतु पोलिसांनी तक्रार घेतली नाही. साबळे यांनी न्यायालयात धाव घेतली.