शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

पालख्या डोंगरावरील खंडोबा मंदिर विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:36 IST

सखाराम शिंदे/ लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील गोविंदवाडी जवळील पालख्या डोंगरावरील खंडोबा मंदिर आहे. या मंदिराचा परिसर गेल्या ...

सखाराम शिंदे/

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : तालुक्यातील गोविंदवाडी जवळील पालख्या डोंगरावरील खंडोबा मंदिर आहे. या मंदिराचा परिसर गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिला आहे. या ठिकाणी भाविकांना कसल्याच सुविधा उपलब्ध नाहीत. याला कारण लोकप्रतिनिधींची उदासीनता आहे. सदर खंडोबा मंदिर तालुक्याचे ग्रामदैवत समजले जाते.

गेवराई शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पालख्या डोंगरावर श्री खंडोबा मंदिर देवस्थान आहे. हे मंदिर पुरातन असून दगडी बांधकाम असलेले आहे. मंदिरावरील कळसाचे कोरीव काम केलेले असल्याने अतिशय मनमोहक दिसते. समोरच भव्य असे दगडी प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या समोरच नवीन सभा मंडप बांधलेला आहे. चारही बाजूने संरक्षण भिंत आहे. मंदिरासमोरच भव्य अशी दीपमाळ भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिरात दगडी पाषाणाची खंडोबांची मूर्ती आहे. समोरच भैरवनाथाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस दगडी असे पुरातन महादेव मंदिर आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून मंदिर व परिसराचा कसलाच विकासच झाला नसल्याने येथे येणाऱ्या भाविकांचे मोठे हाल होत आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. विजेची सोय नाही. परिसराचे सुशोभीकरण नाही. डोंगरावर कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात चिखलच चिखल होतो. या ठिकाणी चंपाषष्टीला तीन दिवस मोठी यात्रा भरत असते. मात्र गेल्या वर्षा कोरोनामुळे ही यात्रा भरली नाही. याही वर्षी यात्रा भरते का नाही यात शंकाच आहे. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे पर्यटनस्थळच आहे. तरी या मंदिर परिसराचा विकास करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, दत्ता दाभाडे, जयसिंग माने, भागवत दहिवाळ, शुभम टाक यांनी केली आहे.

.....

पुरातन भुयाराचे आकर्षण

पालख्या डोंगरावर खंडोबा मंदिराजवळच पुरातन असे भुयार आहे. हे भुयार या डोंगरावरून ते तलवाडा येथील त्वरित देवी मंदिर येथे निघते असे येथील वयोवृद्ध नागरिक सांगतात. मात्र या भुयाराचे पुरातत्व विभागाच्या वतीने संशोधन व्हावे, अशी मागणी मन्यारवाडी येथील नागरिक मदनराव निकम, गजानन चौकटे यांनी केली आहे.

.....

210821\20181121_114329_14.jpg~210821\20181121_114133_14.jpg

गेवराई तालुक्यातील पालखया डोंगरावरील पुरातन खंडोबा मंदिर.~