शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचा सापळा बनला खामगाव-पंढरपूर महामार्ग; गावंदराजवळ भरधाव टिप्परने एकास चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 17:00 IST

गावंदरा गावाजवळचा हा आतापर्यंतचा आठवा अपघात असून पाचवा बळी गेल्याने ग्रामस्थांनी रस्तोरोको आंदोलन करत संताप व्यक्त केला.

धारूर ( बीड) : खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर गावंदरा गावाजवळ भरधाव टिप्परच्या (  क्र एम एच २१ बी एच १६०० ) धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. अपघातानंतर टिप्पर रस्त्याच्या बाजूला उलटून एका घरावर गेले. रामा सिताराम घुले (५०) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, गावंदरा गावाजवळचा हा आतापर्यंतचा आठवा अपघात असून पाचवा बळी गेल्याने ग्रामस्थांनी रस्तोरोको आंदोलन करत संताप व्यक्त केला.

धारूर तालूक्यातून गेलेला खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे अपघाताची मालिकाच सुरू झाली आहे. एकट्या गावंदरा या गावाजवळ आजपर्यंत नऊ अपघात झाले असून आतापर्यंत पाच जणांचे बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज सकाळी अपघातात गावातील ५० वर्षीय रामा घुले यांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी महामार्गावर रस्तारोको आंदोलन केले. महामार्गावर गतिरोधक बसवून सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. 

दरम्यान, तहसीलदार सुरेश पाळवदे, सहायक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी आंदोलनाची दखल घेत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना बोलून घेत तात्काळ उपाययोजनेच्या सूचना केल्या. तसेच याबाबत लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. 

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू