लाखात एक खामगावची लेक; स्त्री जन्माचे मिरवणूक काढून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:35+5:302021-01-04T04:27:35+5:30
‘मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण’ या विषयावर मोनाली आव्हाड हिने मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, मुलींच्या शिक्षणातील अडचणी समजून घेऊन त्यांच्या ...

लाखात एक खामगावची लेक; स्त्री जन्माचे मिरवणूक काढून स्वागत
‘मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण’ या विषयावर मोनाली आव्हाड हिने मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, मुलींच्या शिक्षणातील अडचणी समजून घेऊन त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालकांशी हितगूज साधत, मुलींच्या प्रगतीतील अडथळे दूर करून, पालकांचे उद्बोधन करण्यात आले आणि मुलींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सर्व सावित्रीच्या लेकी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गृहभेटी देऊन विद्यार्थिनी व मातांशी संवाद साधत, महिला शिक्षण दिनाविषयी खामगाव शाळेतील आदर्श शिक्षिका शारदा नागरगोजे यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थिनी शिक्षणाच्या प्रवाहात दिसून आल्याने पालकांचे मनापासून स्वागत केले. निकिता झिने या विद्यार्थिनीची शिकण्याविषयीची तळमळ पाहून, तिला सर्वतोपरी मदतीचे आवाहन शारदा नागरगोजे यांनी केले. नेत्रा व निकिता या विद्यार्थिनींना नवोदय, स्काॅलरशिप, बारावीच्या पुस्तकांचे तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती वाघ हिने केले, तर आभार कार्तिकी डिंगरे हिने मानले.
सहा वर्षांपासून उपक्रम सुरू
सलग सहाव्या वर्षी स्त्री जातीचा सन्मान ‘लाखात एक खामगावची लेक’ या उपक्रमांतर्गत या वर्षीचा जन्मसोहळ्याचा मान सृष्टी महेश खराद या बालिकेला मिळाला. तिची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. तिचे औक्षण करून, आईला साडीचोळी, झाडाचे रोप, बाळाला ड्रेस देऊन सृष्टीचे स्वागत खामगाव शाळेतील माजी विद्यार्थिनी प्राची, नेहा, पल्लवी, माधुरी, प्रेरणा, नीता, जागृती, भाग्यश्री, अनुष्का, सृष्टी यांच्या हस्ते करण्यात आले.