शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बीडमध्ये खुरपुडेबार्इंचा पोलिसांबरोबर लपंडाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:04 IST

व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता.

ठळक मुद्देनिलंबनाचे आदेश धडकले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्या फरार झाल्या. आठवडा उलटूनही त्या अद्याप एसीबीला सापडलेली नाहीत. सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांना चकवा देत खुरपुडेबाई खुलेआम फिरत असल्याने एसीबीची संशयाच्या भोवºयात सापडली आहे. खुरपुडेच्या निलंबनाचे आदेशही कार्यालयात धडकले आहेत.

जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्हा क्रीडा संकुल आणि कार्यालयाचे नियोजन ढेपाळले. एवढेच नव्हे तर संकुलात क्रीडा प्रेमींसह खेळाडूंना कसल्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. येथे आलेला निधी गुत्तेदार आणि आपल्या सहकारी अधिकाºयांच्या संगनमताने हडप केला. त्यामुळे कार्यालयाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला. सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त जात केला होता. असे असतानाही आपण कुठल्याच कामाकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत नसल्याचा आव नंदा खुरपुडे आणत होत्या.

३ एप्रिल रोजी खुरपुडे यांनी शिपाई शेख फईमोद्दीन यांच्या हस्ते लाच दोन लाख रूपयांची लाच मागितली. पैकी ८० हजार रूपये घेताना फईमला रंगेहाथ पकडले. कारवाई झाल्याचे समजताच खुरपुडे यांनी सूंबाल्या केला. त्यांना अटक करण्यासाठी बीडसह लातूर व इतर ठिकाणच्या एसीबीला माहिती देण्यात आली. आठ दिवस उलटूनही त्या अद्याप पोलिसांना सापडल्या नाहीत.

अट्टल दरोडेखोर, चोरटे आणि वर्ग एकच्या अधिकाºयांना आपल्या ‘चाणाक्ष’ बुद्धीच्या आधारे बेड्या ठोकणाºया एसीबीला मात्र खुरपुडे बाई आठवड्यानंतरही सापडत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.याबाबत बीडचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्याशी संपर्क केला, परंतु त्यांनी भ्रमणध्वनी न घेतल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.आता पदभार कोणाकडे ?नंदा खुरपुडे यांच्या निलंबनाचे आदेश नुकतेच क्रीडा कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. आता या पदाचा अतिरिक्त पदभार कोणाकडे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.सध्या कार्यालयात अरविंद विद्यागर हे एकमेव अधिकारी असून इतर क्रीडा मार्गदर्र्शक आहेत.परंतु यापूर्वी क्रीडा मार्गदर्शक अजय पवार यांच्याकडे पदभार सोपविला होता. आता या पदाचा पदभार कोणाकडे, याची उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारBeed policeबीड पोलीसSportsक्रीडा