पुस्तके आणि वर्तमानपत्रांचे वाचन करीत रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:02+5:302021-02-05T08:23:02+5:30
फोटो आष्टी : पुस्तके आणि वर्तमानपत्रांचे वाचन करीत रहा. सतत वाचण्याचा व्यासंग माणसाला ज्ञानाच्या अर्थात विज्ञानाच्या दिशेने घेऊन ...

पुस्तके आणि वर्तमानपत्रांचे वाचन करीत रहा
फोटो
आष्टी : पुस्तके आणि वर्तमानपत्रांचे वाचन करीत रहा. सतत वाचण्याचा व्यासंग माणसाला ज्ञानाच्या अर्थात विज्ञानाच्या दिशेने घेऊन जात असतो. ज्ञान हे माणसाला सर्वगुणसंपन्न बनवते. कॉम्प्युटर, मोबाईलच्या युगात पुन्हा एकदा आपण पुस्तकांकडे आकर्षित झाले पाहिजे, असे विचार आष्टी येथील न्या. शिंपी यांनी व्यक्त केले.
तालुका विधी सेवा समिती आणि आष्टी वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील न्यायालयीन आवारात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कवी प्रा. सय्यद अल्लाउद्दीन यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी असे सांगितले की, मराठी भाषणे आपणाला भरभरून दिले आहे. त्यांनी आपल्या ऋतू, कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही या कवितांनी विशेष दाद मिळविली. ॲड. लटपटे, ॲड. कांतीलाल गव्हाणे यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन ॲड. अजय जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन ॲड. राम मांडवेकर यांनी केले.