शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

दहा निवडणुकांमध्ये केज मतदारसंघावर अंबाजोगाईचाच पगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 18:11 IST

१९७८ पासून केज विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव राहिला. तेव्हापासून आजपर्यंत दहा विधानसभा निवडणुका व एक पोटनिवडणूक मिळून ११ निवडणुका झाल्या.

- मधुकर सिरसटकेज : महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १९७८ पासून अनुसूचित जातीसाठी आरक्षित केज विधानसभा मतदारसंघात झालेल्या एकूण ११ पैकी १० वेळा अंबाजोगाई येथीलच उमेदवार विजयी झाला असून, या मतदारसंघावर अंबाजोगाईचाच पगडा असल्याचे दिसून येते. सध्या केज विधानसभा मतदारसंघात केज नगर पंचायतीसह पूर्ण केज तालुका, अंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई व लोखंडी सावरगाव महसूल मंडळ आणि बीड तालुक्यातील नेकनूर महसूल मंडळाचा समावेश आहे.

१९७८ पासून केज विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव राहिला. तेव्हापासून आजपर्यंत दहा विधानसभा निवडणुका व एक पोटनिवडणूक मिळून ११ निवडणुका झाल्या. यापैकी दहा निवडणुकांमध्ये अंबाजोगाईचा पगडा राहिला. अंबाजोगाई येथील स्थानिक उमेदवारच या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

अंबाजोगाई येथील भागुजी सातपुते हे १९७८ साली अपक्ष, तर १९८५ साली आयसीएसकडून आमदार झाले. १९८० मध्ये काँग्रेस यू.चे गंगाधर स्वामी, तर १९९०, १९९५ मध्ये भाजपकडून व १९९९, २००४, २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. विमल मुंदडा या आमदार झाल्या. २०१२ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे निवडून आले. तर २०१९ मध्ये नमिता मुंदडा या आमदार झाल्या. त्यामुळे अंबाजोगाईचे वर्चस्व राहिल्याचे स्पष्ट होते.

पहिले तीनही आमदार काँग्रेसचेकेज विधानसभा मतदारसंघ सर्वांसाठी खुला असताना १९६२ साली गोविंदराव गायकवाड, १९६७ साली सुंदरराव सोळंके, तर १९७२ मध्ये बाबूराव आडसकर हे तीनही काँग्रेसचे आमदार विजयी झाले होते.

ठोंबरेंनी केजचे खाते उघडले२०१४ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपच्या केज येथील रहिवासी प्रा. संगीता ठोंबरे या अंबाजोगाईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचा पराभव करून विजयी झाल्या. त्यांनी पहिल्यांदाच केज तालुक्याचे खाते उघडले. आजपर्यंत झालेल्या एकूण १४ विधानसभा निवडणुकीत अपवादानेच ठोंबरे या केजच्या आमदार झाल्या होत्या.

राखीवमुळे इतर मतदारसंघ शोधलेकेज मतदारसंघ राखीव राहिल्याने या मतदारसंघात प्रभावी राजकीय वर्चस्व असलेल्या नेत्यांना निवडणूक लढविता आल्या नाही. त्यामुळे या मतदारसंघातील खुल्या प्रवर्गातील अनेकांना इतर मतदारसंघ शोधावे लागले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkaij-acकेज