कडेकरांनी पाळला स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:33 IST2021-03-21T04:33:05+5:302021-03-21T04:33:05+5:30
कडा : वर्षपूर्ती होत असताना कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडा ...

कडेकरांनी पाळला स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू
कडा : वर्षपूर्ती होत असताना कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडा येथे शनिवारी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आला. रविवारीदेखील तो पाळण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जनता कर्फ्यू पाळणारे कडा हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले. जनतेने कडकडीत जनता कर्फ्यू पाळल्याचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आष्टी तालुक्यातील कडा येथे मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना ही साखळी तोडण्यासाठी शहरातील लोकांनी एकत्र येत दोनदिवसीय बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. शनिवारी शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. जनता कर्फ्यू लोकांनी पाळला होता. शनिवारी दुपारी उपविभागीय अधिकारी पाटोदा सुशांत शिंदे यांनी शहरातील विविध ठिकाणी भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी करीत कामकाजाची व कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजना राबविल्या गेल्या व जातात याची पाहणी करीत आरोग्य यंत्रणेवर समाधान व्यक्त केले. यावेळी पोलीस, महसूल, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव
कडा शहरात भविष्यात कोराना रुग्ण वाढले तर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून दोन खासगी रुग्णालयात दोनशे ते पाचशे खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येईल. त्या दृष्टिकोनातून डाॅक्टर व इतर अधिकाऱ्याची बैठक घेण्यात आली. तसा अहवालदेखील जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. येथील प्रशासन व जनतेचा चांगला समन्वय असल्याचे व आरोग्य विभागाचे उल्लेखनीय काम असल्याचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
===Photopath===
200321\nitin kmble_img-20210320-wa0048_14.jpg
===Caption===
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडा येथे दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. शनिवारी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी भेट देऊन विविध भागात पाहणी केली. ू