शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

कड्याचा गावरान कांदा इंडोनेशियात; आवक वाढल्याने शेकडो मजुरांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 7:13 PM

गावरान कांदा उत्पादकांना बाजारात अच्छे दिन आले असून, शेतकर्‍यांना एक हजारापासून अडीच हजारापर्यत प्रतिक्विंटल एवढा भाव मिळत असल्याने  कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर  गाड्यांची विक्रमी आवक होत आहे.

कडा ( बीड ): गावरान कांदा उत्पादकांना बाजारात अच्छे दिन आले असून, शेतकर्‍यांना एक हजारापासून अडीच हजारापर्यत प्रतिक्विंटल एवढा भाव मिळत असल्याने  कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर  गाड्यांची विक्रमी आवक होत आहे. आष्टीचा कांदा प्रथमच सातासमुद्रापार असलेल्या इंडोनेशियाच्या  बाजारात गेला आहे. कांदा आवक वाढल्यामुळे शेकडो मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.

आष्टी तालुक्यात पाच-सहा वर्षांपूर्वी पावसाअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग देखील पुरता हतबल झाला होता. मागील वर्षी सर्वत्र दमदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी शेतकर्‍यांनी यंदा मोठ्या प्रमाणात गावरान कांद्याची लागवड केली. यावर्षी पहिल्यांदाच बाजारात गावरान कांद्याची विक्रमी आवक झाली आहे.

सध्या गावरान कांदा उत्पादकांना कडयाच्या बाजारात प्रतिक्विंटल एक हजार रुपयांपासून अडीच हजारापर्यंत भाव मिळत असल्याने या आठवड्यात येथील बाजारपेठेत आष्टीसह जालना, दौंड, भूम, परंडा, करमाळा, गेवराई, शेवगाव, पाथर्डी, बेलवंडी, इत्यादी ठिकाणावरून कांद्याच्या गाड्या दाखल होत  आहेत. शेकडो टन कांदा कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहे. कांदा ठेवायला देखील जागा कमी पडत होती. 

कांद्याची विक्रमी आवक झाल्याने परिसरातील दीडशे ते दोनशे महिला-पुरुष मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कडयाचा हाच कांदा परदेशात मागणी असल्यामुळे उत्तरप्रदेशसह आॅस्ट्रेलिया, दुबई, लंडन, सिंगापूर,  इंडोनेशिया,श्रीलंका सारख्या देशाच्या बाजारात पाठवला  असल्याचे कांदा व्यापारी बबलू तांबोळी यांनी लोकमतशी बोलताना  सांगितले.

बाजार समितीचाही लौकिककडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कांदा हा उत्तम आणि चांगला गोलाकार मनमोहक असल्याने परदेशात याला मागणी आहे.येथे आवक होेणार्‍या कांद्याला वीस ते पंचवीस रु पये प्रतिकिला भाव तसेच आवकनुसार दरात बदल होतो.ग्रामीण भागातील ही मोठी बाजार समिती असल्याने परदेशात कांद्याची निर्यात होत असल्याने शेतकरी वर्गाला भावही चांगला मिळतो. त्यामुळे बाजार समितीचा लौकिक होत असल्याचे सचिव हनुमंत गळगटे यांनी सांगितले.

मजुरांच्या हाताला कामबाजारात आष्टीसह विविध भागांतून गावरान कांद्याची प्रचंड आवक वाढल्यामुळे चांगल्या व दर्जेदार कांद्याची निवड करून ते गोणीत भरण्यासाठी शंभराहून अधिक मजुरांना दोनशे ते अडीचशे रुपये रोजगार मिळत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.- भिमाबाई सुभाष सोनवणे, मजूर मुकादम

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडonionकांदा