बस सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST2021-01-03T04:33:00+5:302021-01-03T04:33:00+5:30

रौळसगाव-बोरखड रस्त्याची दुरवस्था बीड : तालुक्यातील रौळसगाव व बोरखेड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा ...

Just start | बस सुरू करा

बस सुरू करा

रौळसगाव-बोरखड रस्त्याची दुरवस्था

बीड : तालुक्यातील रौळसगाव व बोरखेड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार खड्डा चुकविताना अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी करून देखील दुर्लक्ष आहे.

गतिरोधकाची दुर्दशा

बीड : शहरातील मुख्य भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले गतिरोधक दुरूस्तीला आले आहेत. गतिरोधक खराब झाल्याने गतीला आवरणे कठीण झाले आहे. यामुळे शहरात नव्याने गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिक, वाहनधारकांतून होत आहे.

इंटरनेट सेवा विस्कळीत

बीड : मागील काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते. सेवा गतीने मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Just start