प्रजासत्ताक दिनानिमित्त संयुक्त ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:54+5:302021-02-05T08:25:54+5:30
याप्रसंगी चीन येथील जागतिक महिला परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व, मराठी वाङ्मयाच्या गाढ्या अभ्यासक प्रा. डॉ. सौ. हेमलता आसरूबा ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त संयुक्त ध्वजारोहण
याप्रसंगी चीन येथील जागतिक महिला परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व, मराठी वाङ्मयाच्या गाढ्या अभ्यासक प्रा. डॉ. सौ. हेमलता आसरूबा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
संस्थेचे सचिव प्रा. जे. पी. शेळके, संचालक इंजि. बलभीमराव जाहेर पाटील, संचालक प्रा. व्ही. एल. जोगदंड, संचालक प्रा. ए. आर. पाटील, संचालक प्रा. शिवाजीराव जगताप तसेच शिवाजीराव कदम, प्रतापराव जोगदंड, एस. आर. हाजगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. शाहू आय. टी. आय.चे प्राचार्य एस. आर. डंबरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. डी. कदम, सर्व निदेशक, शिक्षक, शिक्षिका व इतर सर्व कर्मचारी, पालक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी कोरोनासंदर्भातील सर्व शासकीय नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव प्रा. जे. पी. शेळके यांनी कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन के. बी. सोंडगे यांनी केले.